Himachal Bus Accident : हिमाचलमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बस ६० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

नाहन : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक खासगी बस रस्ता सोडून सुमारे ६० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?



 

मिळालेल्या माहितीनुसार, 'जीत कोच' नावाची ही खासगी बस शिमला येथून कुपवीकडे जात होती. सिरमौर जिल्ह्यातील रेणुकाजी विधानसभा क्षेत्रातील हरिपुरधारजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावरून खाली घसरली आणि खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी प्रवाशांचा मोठा आक्रोश ऐकायला मिळत होता. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, जखमींना हरिपुरधार येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. या रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा नसल्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. सुक्खू सरकारने या रुग्णालयाचा दर्जा कमी (डिनोटिफाई) केल्यामुळे उपचारात अडथळे येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेणुकाजीचे आमदार विनय कुमार आणि एसपी निश्चित सिंह नेगी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्रींनी व्यक्त केला शोक


स्थानिकांचे धाडसी बचावकार्य अपघात होताच हरिपुरधार बाजारपेठेतील स्थानिक नागरिकांनी तातडीने दरीच्या दिशेने धाव घेतली. बस पूर्णपणे चक्काचूर झाल्यामुळे जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने हरिपुरधार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवासी संख्या जास्त असल्याने जखमींचा आकडा मोठा असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "सोलनहून हरिपुरधारला जाणाऱ्या खासगी बसचा झालेला हा अपघात अत्यंत वेदनादायक आहे. या भीषण दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना." या अपघातामुळे संपूर्ण सिरमौर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि