जम्मू–काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ घुसखोरीचा संशय


जम्मू : जम्मू–काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) जवळ घुसखोरीचा संशय निर्माण झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाया सुरू केल्या आहेत. थुराया सॅटेलाइट फोनचा सिग्नल आणि त्यानंतर ड्रोन दिसल्याच्या घटना समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.


संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून येणारी ड्रोनसदृश उडती वस्तू एलओसी (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळील विविध ठिकाणी आढळून आल्या. यामध्ये सायंकाळी ६ .२५ वाजता पूंछ जिल्ह्यातील मनकोट सेक्टरमध्ये टैनहून टोपाकडे एक संशयित ड्रोन जाताना दिसला.त्यानंतर ६. ३५ वाजता राजौरी जिल्ह्यातील टेरयाथमधील खब्बर गावाजवळ आणखी एक ड्रोन आढळून आला. त्यानंतर नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने एका ड्रोनवर गोळीबार केला, तसेच काउंटर-यूएव्ही (anti-drone) उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यानंतर ही उडती साधने पुन्हा सीमापार परतल्याचे निरीक्षणात आले.


सॅटेलाइट फोन सिग्नलमुळे वाढली चिंता


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे ३.३० वाजता जम्मूजवळील कानाचक पोलीस ठाणे हद्दीत थुराया सॅटेलाइट फोनचा सिग्नल पकडला गेला. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या २ किमी अंतरावर असून, जम्मूपासून सुमारे १८ किमी वायव्येला आहे. हा परिसर पाकिस्तानस्थित हँडलर्सकडून वापरला जाणारा घुसखोरी आणि समन्वयाचा परिचित मार्ग मानला जातो. त्यानंतर सायंकाळी ६.२५ वाजता मनकोट–टोपा पट्ट्यात ड्रोन हालचाल दिसून आली, ज्यामुळे टोही (reconnaissance) किंवा सामग्री टाकण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुप्तचर सूत्रांच्या मते, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि ड्रोन हालचाली यामधील वेळेचा जवळचा संबंध हा एखाद्या संयोजित शत्रुत्वपूर्ण कारवाईचा संकेत देतो.


संयुक्त शोधमोहीम सुरू


या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, बीएसएफ, एसओजी आणि जम्मू–काश्मीर पोलीस यांच्या सहभागातून संयुक्त शोध व पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक विश्लेषणासह जमिनीवरील तपास, सिग्नल अ‍ॅनालिसिस आणि परिसरावर वर्चस्व (area domination) प्रस्थापित करण्यावर भर दिला जात आहे.


थुराया ही यूएईस्थित मोबाईल सॅटेलाइट सेवा देणारी कंपनी असून, तिचा वापर सामान्य मोबाइल नेटवर्कपासून दूर असलेल्या भागात संपर्कासाठी केला जातो. गुप्तचर यंत्रणांच्या प्राथमिक तपासात हा सॅटेलाइट सिग्नल मुद्दाम आणि ऑपरेशनल स्वरूपाचा असल्याचे दिसून आले आहे. सूत्रांच्या मते, सीमेपलिकडून हँडलर्सकडून भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा हालचाली मार्गदर्शनासाठी हे सिग्नल सक्रिय केले गेले असावेत. मनकोट–टोपा पट्ट्यातील ड्रोन हालचाल ‘टेस्ट रन’ किंवा प्रयत्नात्मक कारवाई म्हणून तपासली जात आहे.


Comments
Add Comment

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार