शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून मिळवलेला फंड कुठे गेला?


अमित साटम यांचा राज ठाकरेंना सवाल; कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या?


मुंबई : "ठाकरेंनी १९९७ साली शिवउद्योग सेनेची स्थापना केली. फंड मिळवले. पण त्यातून किती तरुणांना उद्योग मिळाला? किती मराठी तरुणांना यांनी मोठे केले? याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी द्यावे. ठराविक एका उद्योगपतीला टार्गेट करणारे राज ठाकरे स्वतःची आर्थिक प्रगती कोहिनूर मॉलच्या माध्यमातून कशी झाली यावर कधी बोलणार आहेत? कोहिनूर मीलच्या जागेवर उभारलेल्या कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे," असे आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मंगळवारी दिले.


राज ठाकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना, "माझा कोणत्याही उद्योग-धंद्यांना विरोध नाही. मात्र एकाच उद्योगपतीने दहा वर्षांत एवढी मोठी झेप घेणं खटकतंय," असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना साटम म्हणाले, "काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा उघडकीस आणला. महाराष्ट्रात उद्योग कशाप्रकारे आले यावर विस्तृत विश्लेषण दिले. यावर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. उद्योगांना माझा विरोध नाही मात्र कमी वेळात मोठे होणाऱ्या उद्योगपतींवर माझा आक्षेप आहे असे म्हटले आहे. परंतु, मराठी तरुणांना उद्योजक बनवायची नीती देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागची काही वर्षे करत आहेत. पण या ठाकरे बंधूंनी मराठी तरुणांना उद्योगाच्या नावाखाली वडापावाच्या गाडीपर्यंतच मर्यादित ठेवले आहे."


साटम म्हणाले, "राज ठाकरे नेहमी मराठीविषयी बोलत असतात. मात्र, या ठाकरेंची मुले मराठी शाळांमध्ये न जाता बॉम्बे स्कॉटिश नावाच्या शाळेत का शिकली? कॉलेजमध्ये त्यांनी जर्मन आणि फ्रेंच या भाषा का शिकल्या? याचेही उत्तर राज ठाकरेंनी द्यावे. मनाचा मोठेपणा जपणाऱ्या मराठी माणसाची बदनामी करणाऱ्या राज ठाकरेंना शेवटी मी खुले आव्हान देतोय, की त्यांनी आपल्या नातवाचा प्रवेश बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत घेऊन दाखवावा," असाही टोला साटम यांनी राज ठाकरेंना लगावला.


"अदानींबद्दल जर ठाकरेंचे ठाम मत असेल तर त्यांनी अदानींच्या गळाभेटी का घेतल्या? त्यांना घरी का बोलवलं? अदानींची कंपनी काही नवीन नाही. त्यामुळे एखाद्याला उगाचच टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे. भ्रष्टाचाराची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेत राहून कशाप्रकारे पापाचा पैसा लाटला हे सर्वश्रुत आहे. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे", अशी टीका अमित साटम यांनी केली.


Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु