थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर कोसळल्याने रेल्वे रुळावरून घसरली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर किमान ३० जण जखमी झाले आहेत. बांधकाम सुरू असलेली क्रेन ट्रेनवर पडल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


थायलंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून थायलंडमधील ईशान्य प्रांतात जाणारी एक रेल्वे रुळावरून घसरली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणची एक मोठी क्रेन रेल्वेच्या डब्यावर कोसळल्याने हा अपघात झाला. पोलिसांच्या मते, बँकॉकच्या ईशान्येस २३० किलोमीटर अंतरावर बुधवारी हा अपघात झाला.


क्रेन रेल्वेच्या एका डब्यावर कोसळल्याने, रेल्वे रुळावरून घसरली आणि त्यानंतर रेल्वेच्या डब्याला आग देखील लागली होती. घटनास्थळी सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. शिवाय, घटनास्थळाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत.


बचाव कर्मचारी जखमींना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आग आटोक्यात आणण्यात आली आहे, परंतु बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे