Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत व्यापाऱ्यांची पळापळ उडवून दिली आहे. शनिवारी पहाटेपासून आयकर विभागाच्या पथकाने नागपुरातील सुपारी व्यापाराशी संबंधित 20 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून तपास सुरू केला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुपारीच्या कथित बेकायदेशीर व्यापारात सहभागी असल्याचा संशय असलेल्या काही नामांकित व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये राजू अण्णा उर्फ राजेश शिनॉय, अलताफ कलीवाला, आसिफ कलीवाला, गनी कलीवाला यांच्यासह काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांचे मुंबईतील सुपारी व्यापारी फारूक भाई यांच्याशी कथित आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा असून, त्याच अनुषंगाने आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. शनिवारी सकाळपासून आयकर विभागाची मोठी टीम शांतिनगर, कामठी रोड, कळमना परिसर आणि मां उमिया इंडस्ट्रियल एरिया येथे सक्रिय होती. राजू अण्णा यांच्या निवासस्थानासह कलीवाला बंधूंची कार्यालये व गोदामांमध्ये सखोल तपास करण्यात आला. याशिवाय इतवारी आणि जागनाथ बुधवारी परिसरातील सुपारी व्यापाराशी संबंधित दुकानांवरही आयकर पथकाने धडक दिली.

या छाप्यांदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एके-47 शस्त्रांनी सज्ज सुरक्षा कर्मचारी आणि डॉग स्क्वॉडच्या उपस्थितीमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता होती. नागपूर हे मध्य भारतातील सुपारी व्यापाराचे प्रमुख केंद्र मानले जाते. येथून मोठ्या प्रमाणावर सुपारीचा पुरवठा विविध राज्यांमध्ये केला जातो, ज्यामध्ये तंबाखू, मावा आणि गुटख्याच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सुपारीचा समावेश असल्याचा संशय आहे.

आयकर विभागाला या व्यापारातून मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी आणि काळ्या पैशाचा व्यवहार झाल्याचा संशय आहे. मात्र, छाप्यांमध्ये नेमके काय निष्पन्न झाले याबाबत आयकर विभागाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईचे खरे स्वरूप समोर येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे नागपूरच्या व्यापारी क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

सोमेश्वर कारखान्यावर विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ"

पुणे: सोमेश्वर कारखान्यावर मिळवलेला हा विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आहे अशा शब्दात आपल्या

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांची आढावा बैठक, प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्याचे दिले आदेश

नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी आरती व विविध शासकीय

Illegal Construction: राज्यातील अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी बंद, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: राज्यात सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत इमारती, झोनिंग न पाहता झालेले

राज्यातील महामार्गांवर नववर्षात ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि

रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ठाणेकरांच्या मनामध्ये असलेल्या

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला