आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन मांडण्यासाठी 'अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदे'ची (आयडब्ल्यूडीसी) तिसरी बैठक शुक्रवारी कोची, केरळ येथे आयोजित करण्यात येणार आहे.


दिवसभर चालणाऱ्या या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल भूषवतील. या बैठकीला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्यासह विविध राज्य सरकारांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश नारायण राणे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


बैठकीदरम्यान बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री विविध राज्यांमध्ये अंतर्देशीय जल वाहतुकीच्या अधिक विकासासाठी नवीन उपक्रमांचा शुभारंभ करतील. अनेक राज्य समर्थन करारांवर स्वाक्षरी होण्याचीदेखील शक्यता आहे, ज्यामुळे अंतर्देशीय जल वाहतूक प्रकल्पांसाठी केंद्र-राज्य सहकार्य अधिक बळकट होईल. 'आयडब्ल्यूडीसी ३.०'च्या अजेंड्यामध्ये नागरी जलवाहतूक प्रणाली अधिक बळकट करणे, मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढवणे, प्रवासी वाहतुकीसाठी हरित नौकांना (ग्रीन वेसल्स) प्रोत्साहन देणे, नदी क्रूझ पर्यटनाला चालना देणे आणि डिजिटल व शाश्वत (सस्टेनेबल) पद्धती लागू करणे यांवरील सत्रांचा समावेश आहे. या बैठकीत अंतर्देशीय जलमार्गांशी संबंधित नियामक आराखड्याचा आढावा घेतला जाईल आणि चालू असलेल्या व प्रस्तावित अंतर्देशीय जलवाहतूक प्रकल्पांशी संबंधित राज्यांच्या सूचनांवरही चर्चा केली जाईल.


भारतात अंतर्देशीय जलमार्गांचे एक व्यापक जाळे आहे, ज्याद्वारे दरवर्षी १४५ दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतूक (कार्गो) केली जाते. यामुळे हा वाहतुकीचा एक इंधन-कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल असा पर्याय ठरतो. अंतर्देशीय जलमार्ग हे अत्यधिक भार असलेल्या रेल्वे आणि रस्ते जाळ्याला पूरक ठरत असून, रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) वाहन वाहतूक आणि नदी क्रूझ पर्यटनासारख्या उपक्रमांनाही सुविधा प्रदान करते. २३ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या एकूण १११ राष्ट्रीय जलमार्गांपैकी ३२ जलमार्ग सध्या मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी कार्यान्वित आहेत. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत 'भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणा'कडे (आयडब्ल्यूएआय) या जलमार्गांचा विकास, देखभाल आणि नियमन करण्याची प्रमुख जबाबदारी आहे. राष्ट्रीय जलमार्गावरील मालवाहतूक २०१३-१४ मधील १८ दशलक्ष टनांवरून वाढून २०२४-२५ मध्ये १४५.८४ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली, तर प्रवासी वाहतूक २०२४-२५ मध्ये ७.६४ कोटींपर्यंत वाढली आहे.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम