जि.प. पं. स.च्या निवडणुकीसाठी अलिबागमधू्न १५० अर्ज दाखल

जिल्हा परिषद ७ जागांसाठी ५५, पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ उमेदवार


अलिबाग : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत अलिबाग तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ५५, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ अर्ज असे एकुण १५० अर्ज दाखल झाले. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, १८ जानेवारीपर्यंत पौष महिना होता. तो अशुभ मानला जात असल्याने उमेदवारांनी १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली. त्यातच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करताना प्रतिस्पर्धी पक्ष कोणता उमेदवार देतो याची चाचपणी सुरू ठेवली, तसेच युती-आघाड्यांची गणिते जुळतात का, याचाही अंदाज बांधला जात होता.


त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात विलंब झाला. युती, आघाडीचे प्रयत्नही केले जात होते. बंडखोरी टाळण्यासाठीदेखील राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यात विलंब केला. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. काही उमेदवारांनी अगदी शेवटची १५ मिनिटे शिल्लक असताना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वेळ साधतानाही अनेक उमेदवारांची दमछाक होत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता होती. राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उशिरा उमेदवारी जाहीर करण्याचा फंडा अवलंबला. शेवटपर्यंत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. उमेदवारी जाहीर होत नसल्याने उमेदवार आणि त्यांचे समर्थक टेन्शनमध्ये होते. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी निवडणूक कार्यालयाकडे धाव घेतली.


रायगड जिल्ह्यात यावेळी युती विरुद्ध आघाडी असे चित्र सध्यातरी दिसत आहे; परंतु काही ठिकाणी विचित्र आघाड्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजप काही ठिकाणी शिवसेनेबरोबर, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. युती-आघाडीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही गणिते जुळली, तर अर्ज मागे घेतले जातील. अर्ज मार्ग घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी आहे. तोपर्यंत पडद्यामागे काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून
राहिले आहे.

Comments
Add Comment

Raigad Shed Collapse : रायगडमध्ये मोठी दुर्घटना : खालापूरजवळ लॉजिस्टिक वेअरहाऊसचे शेड कोसळले; २० ते २५ कामगार अडकल्याची किंवा जखमी झाल्याची भीती

रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यातील

Panvel Karjat Double Railway Line: पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; प्रवाशांची प्रतीक्षा संपणार?

पनवेलकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेल - कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आले असून

Diveagar Accident : दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी होणार; दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.

दिवेआगर बीचवर सहल ठरली शेवटची...; पुण्यातील 8 विद्यार्थी समुद्रात बुडून मृत

रायगड : रायगड जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर असलेल्या दिवेआगर बीचवर (Diveagar Beach) एक अत्यंत हृदयद्रावक आणि

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर थरार! चालत्या बसमधून धुराचे लोट अन् काही क्षणातच...; 14 प्रवाशांचा थरारक जीव वाचला

पनवेल : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. पनवेल हद्दीतील

Pen ganpati idol : पेणच्या गणेशमूर्तींचा जगभरात डंका! यंदा ७० लाखांहून अधिक मूर्तींची विक्री; तब्बल २० लाख बाप्पा परदेशात रवाना

पेण : गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2026) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील