वसई-विरारमध्ये डासांचा वाढला प्रादुर्भाव

वसई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून डासांच्या प्रादुर्भावात प्रचंड वाढ झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जागोजागी पसरलेली अस्वच्छता, उघडी गटारे आणि पालिकेच्या धूर फवारणीचा अभाव यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांचे सावट निर्माण झाले आहे. वसई, विरार आणि नालासोपारा उपनगरांतील सखल भागात साचलेले पाणी आणि उघड्या नाल्यांमधील कचरा डासांच्या उत्पत्तीचे मुख्य केंद्र बनले आहेत. अनेक नाल्यांमध्ये साचलेल्या पानवेली न काढल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, दिवसाढवळ्याही डास चावत असल्याने नागरिकांना दारे-खिडक्या बंद करून घरात राहावे लागत आहे. "डासांच्या भीतीने बाहेरून येणारी मोकळी हवा घेणेही कठीण झाले आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. संध्याकाळ होताच डासांचा हल्ला वाढल्याने घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींचे आरोग्य धोक्यात आले आहे. डास प्रतिबंधक उदबत्त्या आणि कॉइल्सचा वापर करूनही डास कमी होत नसल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. दुसरीकडे, महापालिकेकडून नियमित औषध फवारणी आणि धूर फवारणी केली जात असल्याचा दावा केला जात आहे.

Comments
Add Comment

Virar bullet train station : जपानच्या धर्तीवर बदलणार विरारचा चेहरामोहरा; बुलेट ट्रेन स्थानकाभोवती साकारणार ४६४ हेक्टरची भव्य टाउनशिप!

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai - Ahemdabad Bullet Train) प्रकल्पामुळे विरारच्या विकासाचे नवे दार उघडणार आहे. आगामी विरार

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे

Palghar Leopard Attack : पालघरमध्ये बिबट्याचा भीषण हल्ला! 65 वर्षीय महिला शेतमजुराचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यातील

Vasai Virar E Buses : वसई-विरारच्या परिवहन सेवेला बळ; दिवाळीपूर्वी धावणार ४० नवीन ई-बसेस!

वसई : वाढत्या नागरीकरणामुळे आणि प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे सातत्याने अपुरी पडणाऱ्या वसई-विरार

Vasai Open Drain Accident : वसईत उघड्या गटाराने घेतला चिमुरड्याचा बळी

वसई (प्रतिनिधी) : वसई पूर्वेतील वालीव परिसरात घरामागील उघड्या गटारात पडून अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून