निवडणूक नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य

अलिबाग : राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील १३ जानेवारी २०२६ च्या आदेशान्वये रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२६ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अनिवार्य असल्याचे नमुद करुन, काय करावे व काय करु नये याबाबतची मार्गदर्शक सुचना जिल्हाधिकारी तथा. जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी जारी केल्या आहेत. चालू असलेले कार्यक्रम, योजना पुढे सुरु ठेवता येतील. ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बार्बीच्या संबंधात, राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण, मान्यता प्राप्त करण्यात यावी. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व या संदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील.


मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना, निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना, निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडच्या वापर निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे. विश्रामगृहे,डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरेबाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्वावर उपलब्ध करुन देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत. इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे, केवळ या बाबींशी संबंधित असावी. शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्त्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यांसाठी आवश्यकत्या सर्व परवानग्या मिळविण्यात याव्यात. प्रस्तावित सभेच्या जागी निबंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सवलत मिळण्याविषयी सवलत मिळविली पाहिजे.

वैमनस्य वाढवणारी कृती करु नये : परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये.

Comments
Add Comment

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''

Nashik Crime : गोंदे एमआयडीसीतील गोळीबाराचा छडा; पाच जण ताब्यात, गावठी कट्ट्यासह शस्त्रे जप्त

नाशिक : वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंदे एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा स्थानिक

World Heart Day : सावधान! हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देते 'हे' गंभीर संकेत; वेळेवर ओळखा लक्षणे

World Heart Day : आज 29 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि