''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर'' चुकीचा आणि केरळमध्ये विरोधक जिंकले की ''एसआयआर'' योग्य. हिमाचलमध्ये तुम्ही जिंकलात की ''एसआयआर'' योग्य आणि पश्चिम बंगालमध्ये आम्ही जिंकलो, की एसआयआर चुकीचे. याला दुटप्पीपणा म्हणतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असताना दुर्दैवाने इंडिया आघाडी आणि राहुल गांधींच्या नादी लागून जनाब संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काढत असलेला मोर्चा हा गर्जना मोर्चा नाही तर गजकर्ण मोर्चा आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Navnath Ban)
या मोर्चासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत येणार असतील तर त्यासाठी पेट्रोल-डिझेल, गाड्या, घोडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाईल. हा खर्च करून गर्जना मोर्चा काढण्यापेक्षा गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. गरजू शेतकऱ्यांना मदत करत सरकार या संकटात भरभक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. हा मोर्चा लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा असता, तर केरळ, हिमाचल, कर्नाटक, तेलंगणात काँग्रेसचे तर तामिळनाडूत टीवीके सरकार आहे, त्याबद्दल काय बोलणार आहात, असा सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित केला.
दिल्ली: दिल्ली शहर हे नेहमीच वाहनांच्या गर्दीत अडकलेलं असतं. दिल्लीला सतावणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता केंद्र सरकारने उपाय शोधला आहे. पंतप्रधान नरेंद्र ...
मुळात इंडिया आघाडी कुठल्याही वैचारिक मुद्द्यावर उभी नसल्याची टीका करत श्री. बन म्हणाले, दिल्लीत गांधी कुटुंब, उत्तर प्रदेशात यादव कुटुंब, मुंबईत ठाकरे कुटुंब आणि पश्चिम बंगालमध्ये बॅनर्जी कुटुंब वाचवण्यासाठी ही इंडिया आघाडी आहे. देशातल्या तरुणाईसाठी नाही. कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आम आदमी पार्टी, डीएमके सहभागी नव्हती. वेगवेगळ्या पक्षांची ही बिघाडी झालेली आहे. चार दिवसांपूर्वी काँग्रेसने मुंबईत वेगळी चूल मांडत आंदोलन केले. दिल्लीत काँग्रेस निर्णय घेताना उबाठा गटाला विचारत नाही? इंडिया आघाडीत उबाठा गटाचा वापर कडीपत्त्यासारखा केला जातो. वापरा आणि फेकून द्या, एवढेच उबाठा गटाचे इंडिया आघाडीत स्थान आहे, अशी टीका नवनाथ बन यांनी केली. (Navnath Ban)
बुंदीचे लाडू टणटण उडतात की तुमचे बार फुसके निघतात हे दोन आणि चार तारखेला कळेल. मुळामध्ये सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताऊ पार्टी आहे. अभिजीत दीपकेची टीम ही काँग्रेसची बी टीम आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावरच्या आंदोलनात सहभागी होण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललेय, ते पहावे. वरळीत तुम्हाला तुमचे लोक आता विचारत नाहीत, त्याचे आत्मचिंतन करा. अमित ठाकरेंचा पराभव भाजपाने नाही तर उबाठा गटानेच याच निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार केला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यापेक्षा मनसेने उबाठा आमदाराविरोधात मोर्चा काढावा, अशी सूचनाही नवनाथ बन यांनी केली.
संजय राऊतांनी रोहित पवारांना सर्टिफिकेट दिले की, अजित पवारांच्या अपघाताचा सर्वाधिक तपास सीबीआयपेक्षा रोहित पवारांनी केला आहे. पण आजपर्यंत एकही पुरावा ना रोहित पवार देऊ शकले, ना अन्य कोणी देऊ शकले. फक्त प्रसिद्धीसाठी रोहित पवार पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत. मी 10 तारखेला उघड करणार, 15 तारखेला उघड करणार, 16 तारखेला उघड करणार? हा काय पिक्चरचा ट्रेलर आहे का? तुमच्याकडे काही पुरावे असतील, हिंमत असेल तर तातडीने नाव जाहीर करा, असे नवनाथ बन यांनी सुनावले.