मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना उपयोगी ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट म्हणजेच NSC योजनेत गुंतवणूक करून ठराविक कालावधीनंतर चांगली रक्कम मिळवता येते. या योजनेत केवळ 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.
NSC ही 5 वर्षांच्या कालावधीची बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. त्यामुळे आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कितीही रक्कम गुंतवता येते. मात्र, योजनेचा व्याजदर सरकारकडून वेळोवेळी निश्चित केला जातो. ( Post Office Scheme)
Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. शेखर सुमन यांच्या ‘शेखर टूनाइट’ या चॅट शोच्या गांधी जयंती विशेष भागात संजय ...
साडेचार लाखांवर व्याज मिळवण्याचे गणित
सध्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांवर (NSC) वर 7.7 टक्के वार्षिक व्याजदर असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने केली जाते. त्यामुळे दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या परताव्यावर त्याचा परिणाम होतो. ( Personal Finance)
जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 10 लाख रुपये गुंतवले, तर 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अंदाजे 14.49 लाख रुपये मिळू शकतात. यामध्ये सुमारे 4,49,034 रुपये व्याजाचा समावेश असेल. म्हणजेच 10 लाखांच्या गुंतवणुकीवर जवळपास साडेचार लाख रुपयांचा व्याजातून फायदा होऊ शकतो. पहिल्या वर्षी 77,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 1,59,929 रुपये, तिसऱ्या वर्षी 2,49,044 रुपये, चौथ्या वर्षी 3,45,620 रुपये आणि पाचव्या वर्षी 4,49,034 रुपये व्याज मिळेल.
पोस्ट ऑफिस एनएससी योजनेअंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता
या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे कर सवलत. आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत NSC मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा लाभ मिळू शकतो. मात्र, कर नियम आणि पात्रता लक्षात घेणे आवश्यक आहे.
NSC योजनेचा लाभ भारतीय रहिवासी घेऊ शकतात. प्रौढ व्यक्ती स्वतःच्या नावाने खाते उघडू शकते. अल्पवयीन व्यक्तीसाठीही नियमांनुसार गुंतवणूक करता येते. तसेच दोन किंवा तीन व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात.