Ajit Pawar Plane Crash Video Live : विमान झुकलं, आदळलं अन् क्षणात....अजितदादांच्या विमान अपघाताचा लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज समोर

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाकेबाज नेतृत्व आज कायमचे शांत झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी 'दादां'नी जगाचा निरोप घेतल्याने राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह विमानात असणाऱ्या इतर सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. आता या विमान अपघाताचा पहिला सीसीसीटीव्हीचा विडिओ समोर आला आहे.



विमान अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या शेतात हे विमान कोसळले, त्या शेताजवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताचा हा काळजाचा ठोका चुकवणारा घटनाक्रम कैद झाला आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असल्यानुसार, हे खाजगी जेट विमान कोसळण्यापूर्वी काही वेळ आकाशात घिरट्या घालत होते. विमान लँडिंगच्या प्रयत्नात असतानाच अचानक त्याचे संतुलन बिघडले आणि ते हळूहळू जमिनीच्या दिशेने येऊ लागले. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी विमान शेतात आदळले आणि त्याच क्षणी एका प्रचंड मोठ्या स्फोटासह विमानाने पेट घेतला. अपघाताचा आवाज इतका भयानक होता की, आजूबाजूच्या ३-४ किलोमीटर परिसरात मोठा आवाज ऐकू आला. सीसीटीव्हीमधील दृश्यांवरून अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे. आकाशातून खाली येताना विमानावर वैमानिकाचे नियंत्रण नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असून, काही सेकंदातच विमानाचा अक्षरशः अग्नीगोळा झाला. प्रशासनाकडून या सीसीटीव्ही फूटेजची आता सखोल चौकशी केली जात आहे.



विमान कोसळल्यानंतरही स्फोट झाले


एका बाजूने झुकलेलं हे विमान एका शेतात जाऊन कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. अपघात किती भीषण होता हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. स्फोट होतच विमान खाली कोसळत असल्याचे चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर विमान जमीनीवर पडल्यानंतरही स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. आजूबाजूच्या लोकांना काही सेकंद लागली नेमकं काय झाले आहे हे काळायला.



VT-SSK... 'त्या' दुर्दैवी विमानाची सर्व माहिती समोर...


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता ज्या विमानाने त्यांचा शेवटचा प्रवास झाला, त्या विमानाचे तांत्रिक तपशील समोर आले आहेत. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेले हे विमान क्षणात अग्नीगोळा कसे झाले, यावर आता तज्ज्ञांनी लक्ष केंद्रित केले आहे. अजित पवार ज्या विमानाने बारामतीला निघाले होते, ते VSR (व्हीएसआर) या प्रसिद्ध खाजगी विमान कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट ४५ (Learjet 45) – हे जेट प्रामुख्याने उद्योगपती आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या खाजगी प्रवासासाठी वापरले जाते. VT-SSK व्ही. के. सिंग हे कंपनीचे मालक आहेत. या विमानाचे सारथ्य अनुभवी कॅप्टन रोहित सिंग करत होते. लिअरजेट ४५ हे विमान त्याच्या वेगासाठी आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेसाठी ओळखले जाते. मात्र, अशा प्रगत विमानाचा अपघात होणे ही एक गंभीर बाब मानली जात आहे. या दुर्घटनेत कॅप्टनसह विमानातील पाचही प्रवाशांचा अंत झाला आहे.

Comments
Add Comment

Weather Update : मान्सून गेला, घाम फुटला! महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा; 5 जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी

मुंबई :

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा सुरळीतपणे पुरवठा करण्याचे निर्देश

महाराष्ट्र: राज्यातील जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या

Cm देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केलेल्या ‘वारी’ डॉक्युमेंट्रीचा जागतिक स्तरावर सन्मान

महाराष्ट्र: पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

'व्हीआयपी' पाहुण्यांसाठी राज्य सरकार घेणार 12.68 कोटींच्या गाड्या, वाचा यादी

मुंबई: राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागतासाठी तसेच प्रवासासाठी

Sharad Lad: विधान परिषदेत संधी हुकलेल्या शरद लाड यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेल्या भाजपचे नेते शरद लाड यांची

Maharashtra Drought: दुष्काळी तालुक्यांच्या यादीत आणखी 18 तालुक्यांची भर, पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाला मंजुरी

मुंबई: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून सरकारने आणखी 18 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी (ग्राऊंड