आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट कृती आराखडा सर्वांसमोर मांडणारा असून, विकसित भारत संकल्पनेला चालना देणारा आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते. देशातील प्रत्येक क्षेत्र आणि घटकाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. भारताला आर्थिकदृष्टया बळकट करून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखराकडे वेगाने वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


प्रत्येक घटकाचा विचार करणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल श्री. चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले. श्री. चव्हाण यांनी सांगितले की, उत्पादन वाढ आणि गुंतवणूक वाढीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेषत्वाने भर देण्यात आला आहे. शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग आणि उद्योजक या समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्प आखण्यात आला आहे. आर्थिक विकासाला गती देणे, लोकांच्या क्षमतांचे बळकटीकरण करून त्यांना विकासात सक्रिय भागीदार बनवणे, आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर आधारित सर्वांना संसाधने उपलब्ध करून देणे या तीन प्रमुख कर्तव्यांवर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.


पायाभूत सुविधांना अभूतपूर्व बळ देण्यात आले असून रस्ते, रेल्वे, मेट्रो, बंदरे, ऊर्जा, गृहनिर्माण व डिजिटल कनेक्टिव्हिटी यामधील गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी देशाच्या आर्थिक वृद्धीला नवी दिशा देणा-या आहेत. पायाभूत विकासामुळे लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचेही ते म्हणाले. भारताला जागतिक बायो फार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह ‘बायो फार्मा शक्ती’ ही योजना, मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, असे सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर यातून विकसित भारताची निर्धारशक्ती दिसल्याचेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.


उर्जा सुरक्षेवर भर, सेमी कंटक्टरसाठी तब्बल 40 हजार कोटींची निधी घोषित, वाराणसी आणि पटनामध्ये जहाज केंद्र उभारणी, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि केरळला खनिज कॉरिडॉर, देशाला बायो हब बनवण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पावले, 5 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढवणार, शहर विकासांसाठी 12.2 लाख कोटींची तरतूद, पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतीजलद रेल कॉरिडॉर्स, लघु,मध्यम व सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी स्वावलंबी भारत निधी तयार केला जाणार ही काही ठळक वेशिष्ट्ये अर्थसंकल्पाची असल्याचे श्री. चव्हाण यांनी अधोरेखित केले. भाजपा प्रदेश कार्यलयात रविवारी केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील नामवंत तसेच पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण