Nirmala Sitharaman : ऐतिहासिक बजेटला कांजीवरमचा थाट! अर्थसंकल्पाआधीच निर्मला सीतारमण यांच्या साडीची पडली भुरळ...

नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला सलग नवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला आहे. माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडीत काढत त्यांनी हा बहुमान मिळवला. मात्र, या ऐतिहासिक आकडेवारीसोबतच अर्थमंत्र्यांच्या पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी परिधान केलेली तामिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी गडद जांभळ्या रंगाची 'कट्टम' कांजीवरम सिल्क साडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. अर्थमंत्र्यांनी नेहमीप्रमाणेच 'लोकल टू व्होकल'चा संदेश देत भारतीय हस्तकलेचा सन्मान केला. या साडीवरील 'कट्टम' म्हणजेच वैशिष्ट्यपूर्ण चौकटींची (Checks) नक्षी आणि तिला असलेली आकर्षक सोनेरी झरी बॉर्डर भारतीय विणकाम कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरली. दरवर्षी बजेटच्या दिवशी अर्थमंत्र्यांची साडी ही केवळ फॅशन नसून भारतीय विणकरांच्या कष्टाला दिलेली एक मानवंदना असते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.



अर्थमंत्र्यांनी नेसलेल्या साडीची अंदाजे किंमत किती ?




अर्थसंकल्पाच्या आकडेवारीइतकीच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीच्या किमतीबाबतही सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. फॅशन तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, त्यांनी परिधान केलेली ही पारंपारिक हातमागावरील 'कट्टम' कांजीवरम साडी साधारणतः ३५,००० ते ७०,००० रुपयांच्या घरात असू शकते. शुद्ध रेशीम आणि त्यावरील सोनेरी जरकामामुळे या साडीचे मूल्य अधिक वाढले आहे. कांजीवरम साड्या त्यांच्या टिकाऊपणा आणि राजेशाही थाटासाठी ओळखल्या जातात. या साडीमधील रेशमाचा दर्जा, विणकामाची गुंतागुंत आणि त्यावरील बुट्टीच्या डिझाइननुसार ही किंमत लाखांच्या घरातही जाऊ शकते. अर्थमंत्र्यांनी निवडलेला हा जांभळा रंग आणि दुर्मिळ 'कट्टम' नक्षी भारतीय विणकाम कलेचे वैभव अधोरेखित करते, ज्यामुळे या साडीला एक विशेष ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.



भारतीय हातमागाला पाठिंबा


गेल्या काही वर्षांत निर्मला सीतारामन यांनी ओडिसाची संबलपुरी, धारवाडी कसूती आणि आता कांजीवरम अशा विविध प्रांतीय साड्यांमधून भारतीय विणकरांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आजही संसदेत प्रवेश करताना त्यांच्या हातातील डिजिटल बजेट असलेलं टॅब आणि ही पारंपारिक साडी यांचा मेळ आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम दर्शवत होता.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि