आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल


मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा


मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत.


गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक २० तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, प्रवाशांना झालेला त्रास दुर्देवी आहे. त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे पण एमएसआरडीसीने सुद्धा तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक मागवली. त्यांनीही प्रयत्न केले. मात्र हे काम खूप आव्हानात्मक होते. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ञांना बोलवण्यात आलं. या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलं


दरम्यान प्रवाशांना एमएसआरडीसी कडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते. एवढेच नाही तर पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असे सांगून त्यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितले.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन