विलिनीकरणाची घाई केलेल्यांनी आधी कोणत्या पक्षात जाणार किंवा कुणामध्ये विलिनीकरण करणार या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी -आनंद परांजपे

ठाणे : दादांच्या अपघाती मृत्यूनंतर अजूनही आम्ही दुःखातून सावरलेलो नाही, त्यांचे अग्निसंस्कार होण्याच्या आधीच विलिनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली?असा सवाल उपस्थित करतानाच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे, आम्ही २०२३ मध्ये महायुतीत सामील झालो आहे, त्यामुळे विलिनीकरणाची घाई झालेल्यांनी आधी कोणत्या पक्षात किंवा कुणामध्ये विलिनीकरण करणार या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.


अंजली दमानिया यांचे वाक्य म्हणजे अत्यंत नीच आणि नालायक प्रवृत्ती कशी असते याचे उदाहरण आहे अशा शब्दात आपला संताप आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे.


आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल , प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि पार्थ पवारांवर संशय व्यक्त करणे बरोबर नसून अशा वेळेला अशा पध्दतीचा संशय व्यक्त करुन त्यांनी यापेक्षा नीचता आणि नालायकपणा काय असू शकत नाही असा संतापही व्यक्त केला.


शरद पवार गटाच्या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन अग्निसंस्कार होण्याच्या आधी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली. त्यांनी आधी एनडीए आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सामील होणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि जी भूमिका २ जुलैला अजितदादा पवार यांनी घेतली होती त्यावर आम्ही अजूनही ठाम आहोत असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.


अंजली दमानिया यांना कोर्टाने अधिकार दिला आहे. अंजली दमानिया या सो कॉल्ड समाजसेविका असून त्यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले ते आजपर्यंत कोर्टात टिकलेले नाहीत असेही आनंद परांजपे म्हणाले.


दरम्यान आत्ताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजून चौकशी पूर्ण झालेली नाही हे स्पष्ट केले आहे त्यामुळे सो कॉल्ड समाजसेविकेने देखील थांबावे आणि जे काही सत्य आहे ते समोर येईल अशी विनंती आनंद परांजपे यांनी केले आहे.


संजय राऊत यांचा सकाळी नऊ वाजताचा भोंगा सुरू होऊन दररोज राजकीय आरोप करत असतात मात्र त्यांनी त्यांचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुखांना दिला तर त्यांच्या पक्षाशी होत असलेली पिछेहाट थांबेल हे त्यांच्या भल्याचे राहिल.चौकशी समिती चौकशी करत आहे मात्र संजय राऊत यांनी स्वतःची चौकशी करून कोणत्यातरी निष्कर्षाला पोचून महाराष्ट्राची दिशाभूल करू नये असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

Nitesh Rane: 'जिहादी मानसिकतेला बळ देऊ नका’ युनूस शेख प्रकरणी मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया

मुंबई : ‘हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या आणि जिहादी मानसिकता बाळगणाऱ्यांना बळ देऊ नये,’ अशी

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

‘शिळ्या कढीला ऊत आणू नका!’ आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा...

पुणे : “सुषमाताई अंधारे यांनी मला अभ्यासू आमदार असल्याचे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला शिवसेना, राष्ट्रवादी निवडून आणणार - मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप

भाजपच्या 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पक्षाच्या