इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले गेले आहे. इराणच्या दिशेने अमेरिकेने एक पाऊस पुढे टाकले. दरम्यान इराणने थेट अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर हल्ला करणाऱ्याचे हात कापू आणि पूर्ण जगाला उद्धवस्थ करू असे थेट म्हटले. अमेरिका आणि इराणमधील तणाव फक्त दोन देशांसाठीच नाही तर जगासाठी घातक असल्याचे पुढे आले आहे. तर इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवरही मोठा टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय अमेरिकेने घेतला. इराण सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते आणि याच आंदोलन करणाऱ्या लोकांना पाठबळ देताना अमेरिका दिसली. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे इराणमध्ये इंटरनेटही बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आमच्या घरातील गोष्टींमुळे कोणी बाहेरच्या हस्तक्षेप केला तर ते सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.


आता इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवल्याचे बघायला मिळत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने एक नवीन भूमिगत क्षेपणास्त्र सिटी बांधली आहे. खोरमसिटी-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील पूर्णपणे तैनात केली आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणमधील अणुस्थळे उद्धवस्थ केली होती. यादरम्यानच ही बातमी समोर येत आहे.


भूमिगत क्षेपणास्त्र २००० किलोमीटरचा पल्ला आणि १५०० किलोग्रॅम वजनाचे वॉरहेड असलेल्या या क्षेपणास्त्राने इराणची लष्करी शक्ती लक्षणीयरीत्या वाढवली आहे. हे क्षेपणास्त्र मध्य पूर्वेतील अनेक देश, इस्रायल आणि युरोपच्या काही भागांना टार्गेट करू शकते. फक्त हेच नाही तर अमेरिकन तळांनाही टार्गेट करू शकते. १५०० किलो हे जड वॉरहेड मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यासाठी वापरले जाऊ शकते.


इराणने या क्षेपणास्त्राचा उल्लेख प्रमुख शस्त्र म्हणून केला आहे. फक्त संरक्षणासाठीच नव्हे तर जलद प्रतिहल्ला करण्यासाठी सुद्धा वापरले जाईल. इराणच्या या क्षेपणास्त्रमुळे जगाची झोप उडाली आहे. मोठा हल्ला करण्याची याची क्षमता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष सतत इराणला धमक्या देताना दिसत आहेत. दरम्यानच इराणने आपली नक्की काय ताकद आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के