Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या' दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया चुकली असेल त्यांच्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ही दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी) याची माहिती दिली आहे. त्या यावेळी म्हणाल्या की; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने काही महिलांना योजनेचा लाभ मिळणं बंद झालं होतं. पण आता या अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.



काय म्हणाल्या आदिती तटकरे ?




e-KYC प्रक्रियेत नेमकी चूक काय झाली ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी e-KYC प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये एक प्रश्न असा होता: "तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना?" या प्रश्नाचे उत्तर देताना असंख्य महिलांनी चूक केली. प्रश्न न समजल्याने काही महिलांने या प्रश्नाचे उत्तर 'नाही' ऐवजी 'हो' दिले होते. याचा अर्थ असा झाला की संबंधित महिलेनं मान्य केले की त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे. नियमानुसार घरातील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर संबंधित महिलेला योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे संगणकीय प्रणालीनुसार लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे हप्ते येणे आपोआप बंद झाले.



“जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही” - देवेंद्र फडणवीस


“निवडणुकांच्या काळात विरोधकांनी पसरवले की सरकार ही योजना थांबवेल. पण माझ्या बहिणींना मी स्पष्ट सांगतो, तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही,” असे त्यांनी आश्वासन दिले.


मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात सरकारने कोणतीही योजना बंद केली नाही; उलट लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पिकविमा, आणि कृषीविषयक अनेक निर्णय सातत्याने राबवले जात आहेत. “आम्ही फक्त आश्वासनाची राजकारण करणारे नसून लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्यावर आमचा भर आहे,” असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी