Haryana Accident : हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात झूला कोसळल्याने मोठा अपघात

हरियाणा: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात एक मोठा अपघात घडला आहे. मेळ्यातील एक मोठा त्सुनामी नामक झुला अचानक कोसळल्याने मोठा अपघात होऊन यात अनेक लोक जखमी झाले आहे. दरम्यान या अपघातात झुल्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी पोहोचलेल्या एका पोलीस निरीक्षकासह दहाहुन अधिक लोक जखमी झाले. जखमी निरीक्षकाला गंभीर दुखापत झाली असून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.


पलवल येथे तैनात असलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिस उपायुक्त (डीसी) आयुष सिंह यांनी सांगितले की, या अपघातात एकूण १३ लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास हा झुला कोसळला असून अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीआहे.


दरम्यान, जिल्हा उपायुक्त, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली. महत्वाचे म्हणजे यापूर्वी देखील या ठिकाणी फूड कोर्टमध्ये एक गेट कोसळल्याने एक अपघात झाला होता, ज्यामध्ये दोन लोक जखमी झाले होते.



सूरजकुंड मेळ्यात एकाच दिवशी दोन अपघातांची नोंद


दरम्यान शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी सूरजकुंड मेळ्यात दोन अपघातांची नोंद झाली असून त्यात अनेक लोक जखमी झाले. पहिला अपघात गेट कोसळल्याने झाला, तर दुसरा त्सुनामी झुला कोसळल्याने झाल्याचे वृत्त आहे. या दोन्ही अपघातांमुळे जत्रा समिती आणि आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्या अपघातात एका मुलाला किरकोळ दुखापत झाली, तर एका तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले आणि आता त्याला घरी सोडण्यात आले आहे. या जत्रेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. झूला कोसळल्याने परिसरात गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.


अपघातानंतर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. झूल्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांनी लोकांना घटनास्थळावरून दूर जाण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पोलीस प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने आयोजकांच्या भूमिकेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?