मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला. शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला मारहाण केली. घरात मला कोणीही उलट प्रश्न विचारत नाही मग तू मला विचारणारी कोण ? अशी उद्दाम बडबड करत मोहम्मद खान अन्सारीने धुमाकूळ घातला. या प्रकरणात गुजरात पोलिसांनी मोहम्मद खान अन्सारीला अटक केली.


गुजरातमध्ये बारावीची परीक्षा सुरू आहे. पेपर लिहिण्यासाठी मोहम्मद खान अन्सारी वर्गात २० मिनिटे उशिरा पोहोचला. परीक्षेच्यावेळी एवढा उशिरा पोहोचल्यामुळे वर्गात ड्युटीवर असलेल्या शिक्षिकेने मोहम्मद खान अन्सारीला जाब विचारला. यावर उत्तर देण्याऐवजी घरात मला कोणीही उलट प्रश्न विचारत नाही मग तू मला विचारणारी कोण ? अशी उद्दाम बडबड करत मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेलाच मारहाण सुरू केली. काही विद्यार्थ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे शिक्षिका वाचली. या प्रकरणात पेपर झाल्यानंतर शिक्षिका पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदवणार याची जाणीव मोहम्मद खान अन्सारीला झाली. त्याने परीक्षा झाल्यानंतर वडिलांसह मोठा जमाव आणून शिक्षिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षिका डगमगली नाही. तिने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली.


पोलिसांनी तक्रारीआधारे तपास सुरू केला आहे. शाळेतीली सीसीटीव्ही फूटेज तपासले. अखेर शिक्षिकेला मारहाण केल्याप्रकरणी मोहम्मद खान अन्सारीला पोलिसांनी पकडले. शाळेतील घटनेचे सीसीटीव्ही फूटेज आता व्हायरल होत आहे.




Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि