मुंबई आणि नवी मुंबईत सेकंड हग्स–मायगेटची संयुक्त मोहीम

मुंबई : मुंबई व नवी मुंबईतील रहिवाशांना आता स्‍वच्‍छ व नीटनेटके राहणीमान आणि मुलांसाठी स्‍मार्ट शॉपिंगचा अनुभव मिळणार आहे. संपूर्ण भारतातील मुलांच्‍या उत्‍पादनांच्‍या खरेदी-विक्रीसाठी वेबसाइट सेकंड हग्‍सने भारतातील आघाडीची समुदाय व्‍यवस्‍थापन वेबसाइट मायगेटसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत राज्‍यातील निवडक गृहनिर्माण सोसायट्यांमध्‍ये अनावश्यक वस्तू उपयोगात आणण्यासाठी अनोखी मोहिम राबवण्‍यात येणार आहे.


रविवार १५ फेब्रुवारी रोजी मुंबई व नवी मुंबईतील तीन गृहनिर्माण सोसायट्या रूस्‍तमजी रिजेन्‍सी (दहिसर पश्चिम), मोराज रिव्‍हरसाइड पार्कनेम (पनवेल) आणि लोढा सिएलो (ठाणे पश्चिम) येथे परस्‍पदसंवादात्‍मक किओस्‍क्स स्‍थापित करण्‍यात येतील. यामध्‍ये रहिवाशांना सेकंड हग्‍स वेबसाइटच्‍या माध्‍यमातून मुलांच्‍या उत्‍पादनांची सहजपणे खरेदी-विक्री करण्‍याबाबत माहिती मिळू शकते. या प्रत्‍यक्षपणे राबवण्‍यात येणाऱ्या उपक्रमाला ११ ते १८ फेब्रुवारीपर्यंत मायगेट अॅपवर डिजिटल माध्‍यमाद्वारे पाठिंबा देण्‍यात येईल, ज्‍यासह इन-अॅप बॅनर्स आणि नोटिफिकेशन्‍सच्‍या माध्‍यमातून संपूर्ण शहरामधील लाखो निवासींपर्यंत पोहोचता येईल आणि कुटुंबांना स्‍मार्ट, पसारामुक्‍त पर्यायांची निवड करण्‍याचा संदेश देण्‍यात येईल.


या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत सेकंड हग्‍सच्‍या संस्‍थापिका व सीईओ स्‍वर्णा डागा मिमानी म्‍हणाल्‍या, ''शहरातील घरांमध्‍ये अनेकदा सामानाचा पसारा मोठी समस्‍या असते, विशेषत: मुले मोठी झाल्‍यावर त्‍यांच्‍यासाठी खरेदी केलेल्‍या खेळण्‍यांचा मोठा पसारा होतो. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून आम्‍हाला पालकांना जाणीव करून द्यायचे आहे की, आपल्‍याकडील घरामध्‍ये विनावापर पडून असलेल्‍या वस्‍तू इतरांना देणे अर्थपूर्ण असू शकते. अशा वस्‍तू कुटुंबाला प्रत्‍यक्ष आर्थिक मूल्‍य मिळवून देऊ शकतात. तसेच, यामुळे इतर पालकांना आपल्‍या मुलांसाठी गरजेच्‍या वस्‍तू किफायतशीर दरामध्‍ये मिळवण्‍यास मदत होते. पालकत्‍वाची जबाबदारी काहीशी हलकी करणे आणि एकमेकांना साह्य करणे हाच आमचा मनसुबा आहे.''


सेकंड हग्‍स ही संपूर्ण भारतातील वेबसाइट आहे, जेथे पालक ० ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी वापरलेल्‍या व नवीन वस्‍तूंची खरेदी-विक्री करू शकतात. यामध्‍ये बेबी गिअर, कपडे, खेळणी आणि नर्सरीसाठी आवश्‍यक वस्‍तूंचा समावेश आहे. सुलभता व सोयीसुविधेसाठी डिझाइन करण्‍यात आलेली सेकंड हग्‍स आपल्‍या वेबसाइटवर डिजिटल पेमेंट्स आणि घरपोच पिकअप व डिलिव्‍हरी सेवा देते, ज्‍यामधून खरेदी-विक्रीसाठी सुलभ अनुभव मिळतो.


या वेबसाइटवर सुस्थितीत असलेल्‍या जुन्‍या वस्‍तू उपलब्ध आहेत, ज्या मूळ किमतीपेक्षा ५० टक्‍के किंवा त्यापेक्षा अधिक सवलतीच्‍या दरांत मिळतात. तसेच ही वेबसाइट प्रत्‍यक्ष घाऊक व्यापाऱ्यांकडून मिळवलेली मुलांची अगदी नवीन उत्पादने देखील उपलब्ध करून देते. यामुळे कुटुंबांना उच्‍च दर्जाच्या आवश्यक वस्तू अत्यंत स्वस्त व किफायतशीर दरांमध्‍ये मिळू शकतात.


मुंबई व नवी मुंबईमध्‍ये राबवण्‍यात येणारे हे क्रियाकलाप महाराष्‍ट्र आणि तेलंगणामधील मोठ्या बहु-शहरीय मोहिमेचा भाग आहेत, ज्‍यासह भारतातील पालकांसाठी मुलांच्‍या उत्‍पादनांची खरेदी-विक्री सुलभ, किफायतशीर व सहजसाध्य करण्‍याप्रती सेकंड हग्‍सचे मिशन अधिक दृढ होत आहे.

Comments
Add Comment

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

Gold Silver Rate : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण , पाहा आजचे दर

Gold Silver Rate : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. गेल्या काही

RBI Repo Rate : कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार; आरबीआय रेपो रेट वाढवण्याच्या तयारीत, काय होणार परिणाम?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आगामी द्वैमासिक मौद्रिक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय आढावा बैठक 5 ते 7

LPG Cylinder Price: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल सिलेंडर महाग; घरगुती गॅसचे दर स्थिर

LPG Cylinder Price:  ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तेल

Bank New Rule : 1 ऑक्टोबरपासून बल्क FDच्या व्याजदरांमध्ये मोठा बदल , बँकांना दररोज वेबसाइटवर द्यावी लागणार माहिती

Bank New Rule : 1 ऑक्टोबर 2026 पासून बँकिंग क्षेत्रात महत्त्वाचा बदल होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नव्या

भारीच ! UMANG App च्या मदतीने घरबसल्या करा PF ची 'ही' कामे

UMANG App : दर महिन्याला तुमच्या पगारातून PF म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची (EPF) रक्कम कापली जाते का ? असेल तर तुमच्यासाठी एक