पूर्व उपनगराला १८ वर्षांनंतर लाभला महापौर

मुंबई :  मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. येत्या बुधवारी या निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाईल. रितू तावडे या पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व भागातील असून तावडे यांच्या रुपातून पश्चिम उपनगराला तब्बल १८ वर्षांनंतर महापौर लाभणार आहे. यापूर्वी सन २००५-०७ या कालावधीत पूर्व उपनगरातून दत्ता दळवी हे शेवटचे महापौर झाले होते.


मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.. यासाठी शनिवारी ०७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध असल्यामुळे महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड होणार आहे . रितू तावडे यांच्या रुपात पूर्व उपनगराला तब्बल १८ ते २० वर्षांनी महापौर लाभला आहे. सन १९९६-९७ पासून सन २०२२ पर्यंत तत्कालिन शिवसेनेचे महापौर निवडून येत असून या कालावधीमध्ये एकमेव महापौर हा पूर्व उपनगरातील लाभला आहे. सन २००५- २००७मध्ये पूर्व उपनगरातील विक्रोळीतील नगरसेवक दत्ता दळवी यांची निवड करण्यात आली होती. या कालावधीमध्ये सात महापौर हे शहर भागातील होते . तर तीन महापौर हे पश्चिम उपनगरातील होते.


काँग्रेसच्या सन १९९२ ते ९७च्या काळातील चार महापौरांपैंकी चारही महापौर पनगरातील होते.. यामध्ये तीन महापौर पूर्व उपनगराचे आणि एक महापौर पश्चिम उपनगरातील होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण