Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ संभाजी पाटीलचा भीषण कार अपघात झाला. सोमवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.


संभाजी पाटील पुण्याहून गुजरातच्या दिशेने प्रशिक्षणासाठी जात होता. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश गावाजवळ, त्याची भरधाव फॉर्च्युनर कार एका उभ्या असलेल्या अवजड हयावा ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग ट्रकच्या खाली घुसला आणि गाडीचा चेंदामेंदा झाला.


नेमकं घडलं काय?



अपघातात संभाजी पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र प्रणय आणि प्रशांत चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंढे करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असलेला संभाजी पाटील बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने नेमबाजीमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके पटकावली होती.


संभाजी पाटील नेमबाजीतील कारकीर्द



२०१६- कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत (गबाना) सुवर्णपदक.
२०१७ - कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत सांघिक रौप्य पदक.
२०१८-२० - ऑल इंडिया रेल्वे आणि मध्य रेल्वे नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्याने सुवर्णपदके.
अलीकडेच त्याची पुन्हा एकदा राष्ट्रीय नेमबाज म्हणून निवड झाली होती.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा