Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला विमान प्रवास



मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दररोज नवनवे तर्कवितर्क लावले जात असताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील हा अपघात नव्हे, तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित यांनी अपघाताच्या आधी घडलेल्या घटनांचा क्रमवार उल्लेख करत, वेळापत्रकातील बदल, अचानक विमान प्रवासाची गरज आणि काही महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित बाबी संशय अधिक गडद करणाऱ्या असल्याचा दावा केला आहे.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले, “२७ जानेवारी रोजी अजित पवार हे कॅबिनेट बैठकीनंतर नियोजनाप्रमाणे संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला जाणार होते. त्यासाठी ताफाही तयार ठेवण्यात आला होता. मात्र, ते प्रत्यक्षात पुण्याला का निघाले नाहीत? कॅबिनेट बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी पुढील चार-पाच तास आपली कामे, पक्षातील नेते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भेटींसाठी राखीव असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संध्याकाळी पुण्याला जाण्याचा त्यांचा निर्णय होता. त्याच दिवशी पूर्व विदर्भातील एक अत्यंत मोठे नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी येणार होते. मात्र, ते अपेक्षेपेक्षा उशिरा पोहोचले. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा दीर्घकाळ सुरू राहिल्याने अजित पवार यांचा वेळ त्यातच गेला. परिणामी, संध्याकाळी पाच-साडेपाच वाजता गाडीने निघण्याचा नियोजित कार्यक्रम रद्द झाला. वेळ निघून गेल्याने त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही आणि त्यांना विमान प्रवासाचा निर्णय घ्यावा लागला”, असे रोहित पवार यांनी सांगितले.



पूर्व विदर्भातील नेत्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची फाईल सहीसाठी येणार होती. कुणाचा फोन आला होता, हे स्पष्ट नसले, तरी त्या फाईलवर तातडीने सही करणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ही फाईल अजित पवार यांच्या बंगल्यावर नसून मंत्रालयातील कार्यालयात असल्याचे लक्षात आल्यानंतर ती मागवण्यात आली. अजित पवार सहसा प्रलंबित कामे ठेवत नसत, मात्र या वेळी अचानक ती फाईल कार्यालयातच राहिली होती. फाईल पोहोचेपर्यंत वेळ गेला आणि सही होईपर्यंत अजित पवार यांना अधिक विलंब झाला, असा दावा रोहित यांनी केला.



रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, आपल्या संपर्कातील लोक आणि अजित पवार यांच्यासोबत काम करणारे अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चांमधून काही संवेदनशील बाबी समोर आल्या. अजित पवार यांच्या शेवटच्या तीन-चार महिन्यांत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अतिशय महत्त्वाच्या चर्चा होत होत्या. त्या चर्चांमध्ये काही राजकीय कन्सल्टंट्सचे शेकडो कोटींचे करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत होता, कारण त्यातून कोणताही फायदा होत नसल्याचे मत अजित पवार यांचे होते. अपघाताच्या अवघ्या सात दिवस आधी बारामती हॉस्टेल येथे झालेल्या भेटीतही अजित पवार यांनी काही लोकांना स्पष्ट शब्दांत ‘राजकारण शिकवू नका, आम्हाला काय करायचे ते आम्हाला माहीत आहे’, असे सुनावल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.



रोहित पवारांना संशय कशावर?


पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी घातपाताची शक्यता व्यक्त करणारी काही कारणेही मांडली. त्यामध्ये अजित पवार यांचा दौरा अचानक बदलणे, विमानाची वेळ आणि पायलट बदलणे, केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालात आणि एटीसी ट्रान्सक्रिप्टमधील वेळेतील विसंगती, फ्लाइट रडारचा डेटा अपघाताच्या एक मिनिट आधी बंद पडणे, कमी दृश्यता असताना लँडिंगचा निर्णय, रनवे २९ ऐवजी ११ वर उतरवण्याचा आग्रह, शेवटच्या काही मिनिटांत पायलटने एकही शब्द न बोलणे, या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला. या सर्व बाबी एकत्रितपणे पाहिल्यास, हा केवळ अपघात नसून त्यामागे काहीतरी वेगळे कारण असू शकते, असा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा