Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित पदावर काम करणाऱ्या महिलेला स्वत:च्याच घरात ज्या छळाचा सामना करावा लागला, ते ऐकून कोणाचेही मन विषण्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा भयानक प्रकार आता चव्हाट्यावर आला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेने तिच्याच सासर्‍यावर अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केले आहेत.



नेमकं प्रकरण काय ?



हे संतापजनक प्रकरण कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलुरु शहरातून समोर आले आहे. येथील नॉर्थ बेंगलुरु भागात राहणाऱ्या एका खाजगी शाळेच्या महिला प्रिन्सिपलने आपल्या सासर्‍याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे. मागील ६ वर्षांपासून आपला शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.



मागील ६ वर्षांपासून छळ



ही पीडित महिला २००७ पासून शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून एका प्रसिद्ध शाळेत प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनुसार, लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्षे सुखात गेली, मात्र २०२० पासून तिच्या सासर्‍याने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळ्या घरात राहत होते. पीडित महिला घरी एकटी असायची, तेव्हा तिचा सासरा घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे आणि शारीरिक शोषण करायचा, असा गंभीर आरोप तिने केला आहे.



पीडित महिला गप्प का होती?



आपल्यासोबत घडणारा हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलांना इजा पोहचवू, अशी धमकी आरोपी सासरा वारंवार देत होता. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि घराची अब्रू वाचवण्यासाठी ही महिला इतके दिवस गप्प राहिली. परिस्थिती कधीतरी सुधारेल अशी तिला आशा होती, परंतु सासर्‍याचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. अखेर सहनशक्ती संपल्यावर तिने हा सर्व प्रकार नवऱ्याला सांगितला. त्यानंतर घरातील मोठ्या व्यक्तींनी मध्यस्थी करून आरोपीला ताकीद दिली होती, ज्यामुळे काही काळ हा त्रास थांबला होता.



सासर्‍याची मजल इतकी वाढली होती की, त्याने घरच नाही तर पीडित महिलेच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच शाळेत जाऊनही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. शाळेच्या केबिनमध्ये आणि अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्‍याने अनेकदा छळ केल्याचे महिलेने तक्रारीत स्पष्ट केले आहे. आरोपी तिला वारंवार अश्लील मजकूर असलेली हाताने लिहिलेली पत्रे द्यायचा आणि ती वाचायला लावून पुन्हा स्वतःकडे परत घ्यायचा. हा सर्व प्रकार २०२० पासून डिसेंबर २०२५ पर्यंत सातत्याने सुरू होता.


या प्रकरणाने गंभीर वळण १५ डिसेंबर २०२५ रोजी घेतले. सकाळी ७.३० च्या सुमारास महिला जेव्हा कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली, तेव्हा अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ सासर्‍याने पुन्हा तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने याला कडाडून विरोध केला, तेव्हा संतापलेल्या सासर्‍याने तिच्या पोटावर जोरात ठोसा मारला आणि तिथून पळ काढला. या शारीरिक हल्ल्यानंतर महिलेने अखेर पोलिसांत धाव घेण्याचा निर्णय घेतला.


याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील गंभीर स्वरूप लक्षात घेता राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या महिलेला जर घरातच अशा संकटाचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

लडाखमध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना 'एकता दिवस'ची दिली शपथ

[caption id="attachment_1070982" align="aligncenter" width="800"] लेह, लदाख मध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यात आला. लडाखच्या केंद्रशासित प्रदेश

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट; पैठणीच्या कलाकुसरीचे केले कौतुक

गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष

Ashutosh Dixit : एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; 43 वर्षांच्या सेवेनंतर ए. पी. सिंह निवृत्त

Defence News: एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. तब्बल 43

उत्तराखंड रन फॉर युनिटी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींच्या घोषणा; पीआरडी जवानांचे मानधन वाढणार, प्रत्येक ग्रामपंचायतीत क्रीडा क्लब!

[caption id="attachment_1070936" align="aligncenter" width="800"] राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देहरादून येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर ‘रन फॉर युनिटी’ या

El Nino ची पाठ फिरताच 2027 मध्ये येणार La Nina चं महासंकट; अतिवृष्टी आणि महापुराचा इशारा

जगभरातील हवामानाचे चक्र वेगाने बदलत असून आता एक नवीन आणि अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. एल निनोचा प्रभाव ओसरत

Census of India : 2027 च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार सुरुवात, काही राज्यांमध्ये नोंदणी लांबणीवर

केंद्र सरकारने अखेर देशातील आगामी जनगणनेची अधिकृत घोषणा करत तिचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचे जनगणना