Census of India : 2027 च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार सुरुवात, काही राज्यांमध्ये नोंदणी लांबणीवर

केंद्र सरकारने 2027 च्या जनगणनेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान देशभरात जनगणनेचे मुख्य काम होणार असून, नागरिकांना 10 ते 24 जानेवारीदरम्यान ऑनलाइन स्व-नोंदणी करता येणार आहे. कोरोना महामारीमुळे रखडलेली जनगणना तब्बल 16 वर्षांनंतर होणार आहे.

केंद्र सरकारने अखेर देशातील आगामी जनगणनेची अधिकृत घोषणा करत तिचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचे जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशभरात 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत जनगणनेचे मुख्य काम पार पडणार आहे. या राष्ट्रीय मोहिमेसाठी 1 मार्च 2027 रोजी मध्यरात्री 12 वाजताची वेळ ही 'संदर्भ तारीख' (Reference Date) म्हणून निश्चित करण्यात आली आहे. अधिसुचनेनुसार, भौगोलिक आव्हाने आणि राजकीय घडामोडींमुळे काही विशिष्ट भागात ही प्रक्रिया या कालावधीत पार पडणार नाही. यामध्ये लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अत्यंत बर्फाच्छादित भागांचा समावेश आहे. यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकांमुळे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांमध्ये तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मणिपूरमध्ये (पुढील आदेशापर्यंत) जनगणनेचे काम या निश्चित तारखांना होणार नाही. या वगळण्यात आलेल्या प्रदेशांसाठी जनगणनेच्या स्वतंत्र तारखा नंतर जाहीर केल्या जातील.


नागरिकांसाठी 'ऑनलाइन स्व-नोंदणी' सुविधा


डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सरकार एक विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू करणार आहे. 10 जानेवारी ते 24 जानेवारी 2027 दरम्यान नागरिकांना या पोर्टलवर जाऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती स्वतः नोंदवण्याची (Self-enumeration) संधी उपलब्ध असेल. घरोघरी जाऊन केली जाणारी प्रत्यक्ष जनगणना पूर्ण झाल्यानंतर, नोंदींची अंतिम जुळवाजुळव आणि आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी 1 मार्च ते 5 मार्च 2027 दरम्यान एक विशेष 'पुनरावलोकन फेरी' (Revisional Round) आयोजित केली जाईल.



16 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर होतेय जनगणना


भारतात याआधी शेवटची जनगणना 2011 मध्ये दोन टप्प्यांत पार पडली होती. नियमानुसार 10 वर्षांनंतर म्हणजेच 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. त्यासाठी केंद्र सरकारने एप्रिल ते सप्टेंबर 2020 दरम्यान पहिला टप्पा आणि फेब्रुवारी 2021 मध्ये दुसरा टप्पा घेण्याचे नियोजन केले होते. 1 एप्रिल 2020 पासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू होणार होती; परंतु देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या भीषण संकटामुळे संपूर्ण प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. ही प्रक्रिया आता 2027 च्या नवीन वेळापत्रकामुळे पुन्हा रुळावर आली असून, 16 वर्षांनंतर देशाची नवीन लोकसंख्या आणि सामाजिक-आर्थिक आकडेवारी समोर येणार आहे.

Comments
Add Comment

Delhi Fire : दिल्लीत मंगोलपुरी येथील कारखान्याला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Delhi News: दिल्लीतील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या पादत्राणे बनवण्याच्या कारखान्याला शुक्रवारी रात्री

ISRO : इस्रोची मोठी कामगिरी! भारताचा NVS-03 नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी भारताचा पुढील पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह NVS-03

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न

Vande Bharat Sleeper: रात्री वाराणसीला शांत झोपायचं अन् सकाळी दिल्लीत उठायचं! वंदे भारत स्लीपरचं पाहा संपूर्ण शेड्युल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून 'नाईट ट्रेन'ची घोषणा करण्यात आली होती. ही एक्स्प्रेस

Badrinath Helicopter Crash Update: बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सहा जणांपैकी चौघांचा मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथ- डेहराडून दरम्यान धावणाऱ्या एका हॅलिकॉप्टरचा अपघात

Badrinath Helicopter Crash: मोठी दुर्घटना! बद्रीनाथहून निघालाले हेलिकॉप्टर जोशीमठमध्ये कोसळले, पायलटसह 6 जण बेपत्ता

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम