Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारतीय पासपोर्ट आता १० स्थानांनी वर चढून ७५ व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी मागच्या वर्षी भारतीय पासपोर्ट ८५ व्या स्थानावर होता. भारतीय पासपोर्टचे रँकिंग सुधारणे म्हणजे भारतीय नागरिकांना अधिकाधिक देशांकडून व्हिसा फ्री (व्हिसा मुक्त) किंवा आगमन होताच व्हिसाची सोय उपलब्ध होणे असा आहे.


भारतीय नागरिक सध्या जगातील ५६ देशांमध्ये व्हिसा फ्री (व्हिसा मुक्त) किंवा आगमन होताच व्हिसाची सोय उपलब्ध होणे या पर्यायांचा लाभ घेऊन परदेश प्रवास करू शकतात. अंगोला, बार्बाडोस, भूतान, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, कुक बेटे, डोमिनिका, फिजी, ग्रेनेडा, हैती, जमैका, कझाकस्तान, केनिया, किरिबाटी, मकाओ, मलेशिया, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मोंटसेराट, नेपाळ, फिलीपिन्स, रवांडा, सेनेगल, सेशेल्स, सेंट किट्स आणि नेव्हिस, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, वानुआटु, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स येथे भारतीयांना व्हिसा फ्री (व्हिसा मुक्त) प्रवेश आहे. बुरुंडी, कंबोडिया, केप व्हर्डे बेटे, कोमोरो बेटे, जिबूती, इथिओपिया, गिनी-बिसाऊ, इंडोनेशिया, जॉर्डन, लाओस, मादागास्कर, मालदीव, मार्शल बेटे, मंगोलिया, मोझांबिक, म्यानमार, नियू, पलाऊ बेटे, कतार, सामोआ, सिएरा लिओन, श्रीलंका, सेंट लुसिया, टांझानिया, तिमोर-लेस्टे, तुवालू, झिम्बाब्वे येथे भारतीयांना आगमन होताच व्हिसाची सोय उपलब्ध आहे. अल्बेनिया, अँग्विला, अँटिग्वा आणि बारबुडा, आर्मेनिया, अझरबैजान, बहरीन, बांगलादेश, बेनिन, बोलिव्हिया, बोत्स्वाना, बुर्किना फासो, कॅमेरून, कोलंबिया, काँगो (डेमोक्रॅटिक रिपब्लिक), कोट डी'आयव्होअर, क्युबा, विषुववृत्तीय गिनी, गॅबॉन, जॉर्जिया, गिनी, किर्गिस्तान, मॉरिटानिया, मोल्दोव्हा, मोरोक्को, नामिबिया, नायजेरिया, ओमान, रशियन फेडरेशन, साओ टोमे आणि प्रिन्सिपे, सिंगापूर, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण सुदान, सेंट हेलेना, सुरिनाम, सीरिया, ताजिकिस्तान, बहामास, टोगो, तुर्कीये, युगांडा, युक्रेन, उझबेकिस्तान, व्हिएतनाम, झांबिया या देशांचे ई-व्हिसा भारतीयांना उपलब्ध आहेत.


हेन्ले पासपोर्ट इंडेक्स एखाद्या देशाच्या पासपोर्टला किती देशांमध्ये व्हिसा फ्री (व्हिसा मुक्त) किंवा आगमन होताच व्हिसाची सोय उपलब्ध आहे याआधारे रँकिंग देतो. जगभर या रँकिंगला महत्त्व आहे. ताज्या हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारतीय पासपोर्ट जागतिक रँकिंगमध्ये ७५ व्या स्थानावर आहे. या यादीत सिंगापूर पहिल्या तर जपान आणि दक्षिण कोरिया संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. सिंगापूरच्या पासपोर्टवर १९२ देशांत व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो तर जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांच्या पासपोर्टवर १८७ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. स्वीडन आणि संयुक्त अरब अमिराती हे संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत कारण या दोन्ही देशांच्या पासपोर्टवर १८६ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो.


फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंडसह अनेक युरोपीय देश चौथ्या स्थानावर आहेत, ज्यांचे पासपोर्ट १८५ ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी देतात. ऑस्ट्रिया, ग्रीस, माल्टा आणि पोर्तुगाल पाचव्या स्थानावर आहेत कारण या देशांच्या पासपोर्टवर १८४ ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवास शक्य आहे. मजबूत पासपोर्ट असलेल्या इतर देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम (यूके), कॅनडा आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?