IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान १८ ओव्हरमध्ये १४४ धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकला होता. पाकिस्तानच्या या पराभवानंतर स्टेडिअममध्ये थाटात बसलेल्या पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीवर तोंड लपवून पळायची वेळ आली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.


खरं तर बहिष्काराच्या नाट्यानंतर आयसीसीने दोन्ही देशांच्या बोर्डाना स्टेडिअममध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान मिटिंग ही होणार असल्याचे बोलले गेले होते. मात्र मिटिंग झाली की नाही? याची ठोस माहिती मिळू शकली नाही. परंतु पाकिस्तानच्या पराभवानंतर थाटात बसलेल्या मोहसीन नक्वीची विचित्र अवस्था झाली होती, हे मात्र नक्की आहे.


मोहसीन नक्वीने मागच्या अनेक दिवसापासून बहिष्काराचा नाटकं सुरू केलं होतं.त्यामुळे तो अनेत आठवडे चर्चेच्या केंद्रस्थानी होता. तसेच या बहिष्काराने पाकिस्तान बोर्डाचे प्रचंड मोठं नुकसान होणार होतं. पण तरी देखील मोहसीन नक्बी बहिष्कारावर ठाम राहिला होता. त्यानंतर संभाव्य नुकसान लक्षात येऊन पाकिस्तानने माघार घेतली होती. त्यामुळेच आजचा भारत पाकिस्तानचा सामना पार पडला.


दरम्यान आज ज्याप्रमाणे पीसीबी बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी मैदानात आले होते. ते पाहता त्यांना पाकिस्तानच्या खेळाडूंवर प्रचंड विश्वास होत होता. मात्र पोरांनी अध्यक्षांसमोर माती खाली. त्यामुळे मोहसीन नक्वींच नाकं कापलं. या पराभवानंतर मोहसीन नक्वीवर तोंड लपवून पळायची वेळ आली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय चाहत्यांना हसू आवरता येत नाही आहे.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?