PM Modi Israel Visit: मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले भारताचे कौतुक; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित इस्रायल दौऱ्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे कौतुक केले असून भारत–इस्रायल संबंधांना भक्कम भागीदारी असे संबोधले आहे.


जेरुसलेममध्ये मेजर अमेरिकन ज्यूइश ऑर्गनायझेशन्सच्या परिषदेला संबोधित करताना नेतन्याहू यांनी सांगितले की पुढील आठवड्यात भारताचे पंतप्रधान इस्रायलला भेट देणार असून दोन्ही देश सर्व प्रकारच्या सहकार्याबाबत चर्चा करतील. यावेळी नेत्याहू यांनी भारत–इस्रायल संबंधांना भक्कम भागीदारी असे संबोधले.



मोदींचा दुसरा इस्रायल दौरा:


पंतप्रधान मोदी यांचा इस्रायल दौऱ्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी नवी दिल्लीतील एआय समिटनंतर ते २७-२८ फेब्रुवारीला इस्रायलला जाऊ शकतात. त्यांचा हा दौरा धोरणात्मक, संरक्षण, सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील सहकार्याला नवी दिशा देऊ शकतो. मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच इस्रायल दौरा असेल. यापूर्वी त्यांनी २०१७ मध्ये इस्रायलला भेट दिली होती. त्या ऐतिहासिक दौऱ्यात दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण सहकार्य, शेती, जलव्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी भागीदारी यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती.



पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा:


आगामी भेटीत दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याबरोबरच पश्चिम आशियातील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय करू शकतात. वर्षाच्या सुरुवातीलाही दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला होता, ज्यात गाझाशी संबंधित शांतता प्रयत्न आणि प्रादेशिक स्थैर्याबाबत चर्चा झाली. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी न्याय्य आणि टिकाऊ शांततेसाठी भारताच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला होता.





भारत–इस्रायल संबंधांना नवी ऊर्जा मिळणार:


मोदी आणि नेतन्याहू यांच्यात वैयक्तिक पातळीवरही चांगले संबंध असल्याचे मानले जाते. गेल्या काही वर्षांत दोन्ही नेत्यांनी अनेक मंचांवर एकमेकांशी मैत्री दाखवली आहे. हा संभाव्य दौरा भारत–इस्रायल संबंधांना नवी ऊर्जा देणारा ठरू शकतो. संरक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि प्रादेशिक सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि