भारत-यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन; तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्यात समान सूत्र


मुंबई : "भारत-फ्रान्स सहकार्य अधिक दृढ होत असून परस्पर विश्वास, खुलेपणा आणि महत्त्वाकांक्षा या आधारावर ही भागीदारी पुढे जात आहे. भारत-यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा ठाम पाठिंबा आहे. दहशतवादाविरोधात संयुक्त प्रयत्न आणि दहशतवादी संघटनांचा निषेध करण्यावर फ्रान्स आणि भारताची समान भूमिका आहे", असे प्रतिपादन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी केले.


इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, दोन्ही देशांनी या संबंधांना पुढील टप्प्यावर नेण्यासाठी विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी स्वीकारली आहे. तसेच तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्य यातही समान भूमिका स्वीकारली आहे. भारत–फ्रान्स भागीदारी ही स्थिर, विश्वासार्ह आणि दोन्ही देशांच्या जनतेच्या हितासाठी परिणामकारक ठरत असून भविष्यात ती अधिक प्रभावी करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार आहे. लवकरच फ्रान्स–भारत नवोपक्रम नेटवर्क, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संयुक्त केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा


बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा नवा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा यावेळी केली.


नरेंद्र मोदी यांनी २०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले. अलीकडेच यूरोपियन यूनियनसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे भारत-फ्रान्स व्यापार संबंधांनाही मोठी चालना मिळणार आहे. ‘इंडिया फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमांतर्गत संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अवकाश आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग, स्टार्टअप्स, एमएसएमई, विद्यार्थी आणि संशोधक यांच्यासाठी संयुक्त इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे मोदी यांनी सांगितले.


क्रिटिकल मिनरल्स, बायोटेक्नॉलॉजी आणि अ‍ॅडव्हान्स मटेरियल्समध्ये सहकार्य वाढवले जाणार असून ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय इन हेल्थ’, ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ आणि एरोनॉटिक्स कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


शांततेच्या सर्व प्रयत्नांना भारताचे समर्थन - मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारत आणि फ्रान्स दोन्ही देश लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करूनच जागतिक आव्हानांवर मात करता येईल, अशी दोन्ही देशांची भूमिका असल्याचे सांगून युक्रेन, पश्चिम आशिया किंवा इंडो-पॅसिफिक परिसरात शांततेसाठी सर्व प्रयत्नांना समर्थन देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सर्व प्रकारचा दहशतवाद संपविण्याचीही दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि फ्रान्स दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक दृढ करण्यावर भर दिल्याचे सांगून फ्रान्समध्ये लवकरच ‘स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.


दोन्ही देश मिळून जागतिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी कार्य करूया, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉन यांना केले.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि