राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या.

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे निर्देश


मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांच्या दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.


मंत्रालयात पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, रस्ते विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, उपसचिव प्रज्ञा वाळके, उपसचिव निरंजन तेलंग यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्यात नवीन रस्त्यांची कामे करताना वाहतूक रहदारीचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. विशेषतः डोंगराळ भागातील तसेच जास्त पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रांतील रस्त्यांच्या बांधणीत दर्जेदार व टिकाऊ कामे होण्यासाठी ठराविक पॅरामीटर्स निश्चित करून रस्त्यांचे आयुष्यमान वाढेल अशी कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरांना व जिल्ह्यांना जोडणारे रस्ते या पद्धतीने विकसित करावेत, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.


पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाढत्या वाहतूक वर्दळीचा विचार करता शहरालगतची सर्व रेल्वे स्थानके, विमानतळ, द्रुतगती मार्ग यांना जोडणारे मुख्य रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत. यासाठी अधिकारी स्तरावर समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.


याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील प्रमुख महामार्ग व रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे व प्रसाधनगृह केंद्रांची उभारणी करण्यासह पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.


सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हायब्रीड अ‍ॅन्युटी (HAM) टप्पा-३ अंतर्गत १०,००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून ही कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले.


तसेच नाशिक परिक्रमा मार्ग, पुणे–शिरूर उन्नत मार्ग, हडपसर–यवत मार्ग, तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग आदी महामार्गांच्या कामांचा आढावा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला.


राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत प्रस्तावित रोपवे प्रकल्पांच्या कामकाजाचाही आढावा यावेळीते घेण्यात आला व या कामांना चालना देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच भीमाशंकर ते कर्जत या नवीन रस्त्याच्या आखणीबद्दल व या रस्त्याच्या बांधकाम नियोजचासुद्धा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा