काळा घोडा महोत्सवात महिला बचत गटांची चांदी; तब्बल ९ दिवसांमध्ये कमवले साडेआठ लाख रुपये

मुंबई: मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेला काळा घोडा कला महोत्सव २०२६ मध्ये यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. महानगरपालिका प्रशासनाच्या पुढाकारातून सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.


गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित असते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या अंतर्गत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून बचत गट सदस्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.


मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला लाखो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ व विविध उपयोगी साहित्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



महिला बचत गटांच्या परिश्रमाला यश



या उपक्रमामुळे महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाबरोबरच त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, नव्या ग्राहकांशी थेट संवाद आणि बाजारपेठेचा अनुभव मिळाला. एकूण १८ बचत गटांनी सहभाग नोंदवून आर्थिक स्वावलंबनाचे ठोस उदाहरण निर्माण केले. यावर्षीच्या काळा घोडा महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे प्रथमच तृतीयपंथी बचत गटाने या महोत्सवात सहभाग घेतला.


मुंबई महानगरपालिका महिला बचत गटांना केवळ प्रशिक्षण देत नाही, तर त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. काळा घोडा कला महोत्सवासारख्या जागतिक व्यासपीठावर महिला व तृतीयपंथी समुदायातील सदस्यांना मिळालेला ८ लाख ५४ हजार रुपयांचा स्वयंरोजगार हा त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन