India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये समावेशक आणि ‘सॉव्हरिन एआय’ याविषयावर ते बोलत होते.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जगातील १०० हून अधिक देशांतील प्रतिनिधी या ऐतिहासिक परिषदेत सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून, तंत्रज्ञान कौशल्याचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान म्हणाले की, भारत केवळ नवीन तंत्रज्ञान निर्माण करत नाही, तर ते वेगाने आत्मसातही करतो. देशात तंत्रज्ञान सक्षम करणारी भक्कम परिसंस्था (इकोसिस्टम) निर्माण झाली आहे. काही लोकांना नव्या तंत्रज्ञानाबाबत शंका वाटत असली, तरी भारतीय युवक ज्या वेगाने एआय स्वीकारत आहेत, तो अभूतपूर्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समिटमधील एआय प्रदर्शनाबाबतही मोठा उत्साह दिसून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न:


इतिहासातील निर्णायक टप्प्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काही बदलांनी संपूर्ण शतकांची दिशा बदलली आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा तसाच एक परिवर्तनबिंदू आहे. एआय केवळ यंत्रांना बुद्धिमान बनवत नाही, तर मानवी क्षमताही अनेक पटींनी वाढवत आहे. भविष्यात एआय काय करू शकते हा खरा प्रश्न नाही; आज आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न असल्याचे मोदी म्हणाले.



जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक:


मशीन लर्निंगपासून लर्निंग मशीनपर्यंतचा प्रवास वेगवान, सखोल आणि व्यापक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे मोठा दृष्टीकोन ठेवत जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.यासोबतच, पुढील पिढ्यांच्या हाती आपण एआयचे कोणते स्वरूप देणार आहोत, याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी