Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी


मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी राजकीय नाट्य पाहायला मिळाले. भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवले. या निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले असून, या बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.


.

भिवंडीत महापौर निवडीच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली होती. भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांच्या नावाचा विचार केला होता, मात्र प्रदेश पातळीवरील चर्चेनंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर स्नेहा पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. मात्र, चौधरी यांनी बंडखोरी करीत काँग्रेस आणि शरद पवार गटाचा पाठिंबा मिळवला. महापौर पदाच्या निवडणुकीत त्यांना ४८ मते मिळाली. तर, भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ १६ मतांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांनी २५ मते मिळवली.


या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "महापौरपदाच्या उमेदवारीबाबत पक्षात चर्चा सुरू होती. स्नेहा पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर नारायण चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बंडखोरी केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांना दिला होता. त्यांनी बंडखोरी करणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र निकालातून त्यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे," असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.



पक्षांतर्गत कारवाईचा बडगा


महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी थेट वैचारिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने भाजप नेतृत्वाने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. "ज्यांनी-ज्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांविरुद्ध जाऊन आणि आदेश धाब्यावर बसवून काम केले आहे, त्या सर्वांवर पक्ष नियमानुसार कडक कारवाई करेल," असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण