Adani Ports: अदानी पोर्ट्स आणि मार्सिले करारामुळे जागतिक व्यापाराला मिळणार नवी गती

भारताची सर्वात मोठी खासगी बंदर ऑपरेटर कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) ने जागतिक व्यापार क्षेत्रात महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल उचलत फ्रान्समधील प्रमुख बंदर ग्रँड पोर्ट मेरीटाइम डी मार्सिले यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा करार इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीदरम्यान झाला असून भारत–फ्रान्स रणनीतिक भागीदारीला नवे बळ मिळाले आहे.


या कराराचा केंद्रबिंदू म्हणजे भारत–मध्यपूर्व–युरोप आर्थिक कॉरिडॉर, म्हणजेच India-Middle East-Europe Economic Corridor (आयएमईसी) जागतिक व्यापारासाठी गेम-चेंजर ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. भूमध्य समुद्रातील मार्सिले फॉस बंदर हे युरोपचे प्रमुख प्रवेशद्वार आहे, तर भारतातील मुंद्रा आणि हजीरा ही अडाणी पोर्ट्सची महत्त्वाची बंदरे आहेत. या बंदरांमधील थेट समन्वयामुळे भारत–युरोप दरम्यान मालवाहतुकीचा कालावधी आणि खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.


या सहकार्यांतर्गत ‘आयएमईसी पोर्ट्स क्लब’ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून कॉरिडॉरशी संबंधित विविध बंदरांमध्ये धोरणात्मक समन्वय, गुंतवणूक आणि संवाद वाढवला जाणार आहे. तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देत ‘मुंद्रा–मार्सिले ग्रीन मॅरिटाइम कॉरिडॉर’ विकसित करण्यावरही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यायी इंधनाचा वापर वाढवणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.


तांत्रिक आणि डिजिटल सहकार्यालाही प्राधान्य देण्यात आले असून स्मार्ट पोर्ट प्रणाली, डिजिटायझेशन आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात अनुभवांची देवाणघेवाण केली जाईल. अडाणी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी गुप्ता यांच्या मते, हा करार युरोपपर्यंतची जोड अधिक मजबूत करणारा आहे. मार्सिले फॉस बंदराची सुमारे ७० दशलक्ष टन अतिरिक्त क्षमता आयएमईसीला मोठी गती देणार असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत विश्वासार्ह केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि