साखरपुड्यानंतर ४ दिवसांत जोडप्याचा दुर्दैवी अंत; धाराशिवमध्ये कारचा भीषण अपघात

धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटी परिसरात पहाटे घडलेल्या भीषण अपघातात नुकतेच साखरपुडा झालेले जोडपे जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेने वाशी तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.


सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर पाटीजवळ आज पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. Tata Nexon या चारचाकीने तीव्र वळण घेताना नियंत्रण गमावले आणि समोरील टोल कमानीवर जोरात आदळली.


या अपघातात वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) आणि वाशी येथील अक्षया सुनील चव्हाण (२३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघांचा चार दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली असतानाच घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



नेमके काय घडले?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षया चव्हाण हिच्या महापारेषण परीक्षेसाठी दोघे लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट कमानीवर जाऊन धडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाच्या पुढील भागाचा चुराडा झाला.



वाहतूक काही काळ ठप्प


घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. लग्नाच्या उत्साहात असलेल्या दोन कुटुंबांवर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी