भारतीय सैन्याची मे २०२६ मध्ये पहिली थिएटर कमांड सक्रिय होणार

नवी दिल्ली : देशाच्या लष्करी रचनेत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बदलाचा आराखडा तयार झाला आहे. भूदल, वायुदल आणि नौदल आता संयुक्त थिएटर कमांडच्या अंतर्गत काम करतील. संयुक्त थिएटर कमांडवर ५ वर्षांपासून विचारमंथन सुरू होते. नवीन रचना ३ महिन्यांत औपचारिकपणे समोर येईल. मे २०२६मध्ये पहिली थिएटर कमांड सक्रिय झाल्यावर, आपले सैन्य केवळ संयुक्तच नव्हे, तर थिएटर-रेडी देखील असेल,असे लष्करातील सूत्रांकडून सांगण्यात आले.


यामुळे भारताकडे कोणत्याही लष्करी संघर्षाला तोंड देण्यासाठी एकात्मिक, जलद आणि संयुक्त कमांड इन्फ्रास्ट्रक्चर असेल. निर्णय घेण्यामध्ये ६०-७०% पर्यंत वेग येईल. तसेच, १५-२० % पर्यंत संसाधनांचीही बचत होईल. पाकिस्तान आणि चीन दोन्ही आघाड्यांवर तयारी अधिक चांगली होईल.विशेष म्हणजे, अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये लष्करी यंत्रणा संयुक्त थिएटर कमांडच्या अंतर्गतच कार्यरत आहे. चीनमध्ये ५ तर अमेरिकेत ११ कमांड आहेत.


सैन्य सूत्रांनुसार, एका दशकात पाकिस्तान आणि चीनसोबत झालेल्या ५ संघर्षातून मिळालेले कौशल्य, आव्हाने आणि त्रुटी फिल्टर करून नवीन रचना तयार केली आहे. यात, पाकिस्तानविरुद्ध २०१६ची सर्जिकल स्ट्राइक, २०१९ ची बालाकोट एअर स्ट्राइक आणि २०२५ मध्ये ८८ तास चाललेले ऑपरेशन सिंदूर यांचा समावेश आहे. तर, चीनविरुद्ध २०१७ च्या डोकलाम आणि २०२० च्या गलवान संघर्षातील धडे समाविष्ट आहेत. या प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांनुसार, वेगवेगळ्या सेवांच्या स्वतंत्र कारवाईत कम्युनिकेशन गॅप (संवादातील अंतर) आणि रिसोर्स ओव्हरलॅप (संसाधनांची पुनरावृत्ती) यांसारख्या समस्या समोर आल्या.ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्यांदाच ८८ तासांच्या आत तिन्ही सेनांचे संपूर्ण एकत्रीकरण दिसून आले. क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोन स्वार्म, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि भूदलाचा समन्वय उत्कृष्ट होता.


स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी लष्करी सुधारणा


निवृत्त लेफ्टनंट जनरल एसएल नरसिम्हन यांच्या मते -१९४७ नंतरची ही सर्वात मोठी लष्करी सुधारणा आहे. मे २०२६मध्ये पहिली थिएटर कमांड सक्रिय झाल्यावर, आपले सैन्य केवळ संयुक्तच नव्हे, तर थिएटर-रेडी देखील असेल. अगदी ऑपरेशन सिंदूरच्या ८८ तासांप्रमाणे. प्रत्येक थिएटरमध्ये सायबर, स्पेस आणि विशेष ऑपरेशन्सच्या उप-कमांड असतील. तिन्ही सेनांची सामान्य पुरवठा साखळी आणि देखभाल असेल. गुप्तचर एकत्रीकरण केंद्रे असतील. दोन आघाड्यांवर युद्धाचे प्रोटोकॉल असतील. संसाधने सामायिक करण्याची स्वयंचलित व्यवस्था असेल. प्रत्येक थिएटरमध्ये वर्षातून किमान दोन पूर्ण-स्तरीय संयुक्त सराव होतील.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा