Delhi Fire : दिल्लीत मंगोलपुरी येथील कारखान्याला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Delhi News: दिल्लीतील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या पादत्राणे बनवण्याच्या कारखान्याला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. ( Delhi Fire)



तळघरात लागली आग; धुरामुळे बचावकार्यात अडथळे


अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग कारखान्याच्या तळघरात लागली होती. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत आग नियंत्रणात आणली. मात्र, आगीचा धूर वरच्या चार मजल्यांपर्यंत पसरल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या.


पोलिसांच्या माहितीनुसार, बचाव पथकाने 6 जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढण्यात आले. धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.





कारखान्याच्या मालकाची चौकशी होणार


डीसीपी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारखान्याच्या मालकाला घटनास्थळी बोलावण्यात आले असून, कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. आग लागली तेव्हा कारखान्यात नेमके किती कामगार उपस्थित होते, याची माहितीही गोळा केली जात आहे.


आग तळघरातून पसरल्याने धूर वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचला आणि त्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून तपासणी सुरू होती. आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.


Comments
Add Comment

ISRO : इस्रोची मोठी कामगिरी! भारताचा NVS-03 नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी भारताचा पुढील पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह NVS-03

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न

Vande Bharat Sleeper: रात्री वाराणसीला शांत झोपायचं अन् सकाळी दिल्लीत उठायचं! वंदे भारत स्लीपरचं पाहा संपूर्ण शेड्युल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून 'नाईट ट्रेन'ची घोषणा करण्यात आली होती. ही एक्स्प्रेस

Badrinath Helicopter Crash Update: बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सहा जणांपैकी चौघांचा मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथ- डेहराडून दरम्यान धावणाऱ्या एका हॅलिकॉप्टरचा अपघात

Badrinath Helicopter Crash: मोठी दुर्घटना! बद्रीनाथहून निघालाले हेलिकॉप्टर जोशीमठमध्ये कोसळले, पायलटसह 6 जण बेपत्ता

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम

Railway News: ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबईसह 8 शहरांमध्ये रेल्वेकडून थेट पार्सल घरपोच; स्टेशनवर जाण्याची कटकट गेली

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने आता नागरिकांच्या सेवेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेकडून आता