जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चतरू भागात सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. सुरक्षा पथकाने दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला तसेच 'जैश - ए - मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. आणखी काही दहशतवादी परिसरात लपले असल्यामुळे चकमक अद्याप सुरू आहे.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना 'जैश - ए - मोहम्मद'चे किमान दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा यंत्रणेला दिली. ही माहिती मिळताच सुरक्षा पथकाने किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली. सुरक्षा पथकाने चतरू भागात शोध मोहीम हाती घेतली. जवान थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचणार याची जाणीव होताच दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा पथकाने प्रत्युत्तर दिले. चकमकीत 'जैश - ए - मोहम्मद'चे दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने चतरूमधील दहशतवाद्यांचा एक तळ उद्ध्वस्त केला. लपलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

याआधी ४ फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी चतरू येथे जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला ठार मारले होते. तसेच उधमपूर जिल्ह्यात, एका गुहेत लपलेले जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ग्रेनेड स्फोटात मारले गेले.
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि