गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात आली मोठी अपडेट

मुंबई : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे हिने वरळीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पती अनंत गर्जेचे अन्य महिलेसोबतचे संबंध असल्याचे कळल्याने आलेल्या नैराश्यातून गौरीने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी समजले होते. पण गौरीच्या कुटुंबियांनी गर्जे कुटुंबाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. गौरीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या छळाला वैतागून गौरीने गळफास घेतल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. कायद्यातील तरतुदीनुसार पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप आणि संशयाआधारे पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली होती. आता तब्बल तीन महिन्यांनंतर अनंत गर्जेला जामीन मिळाला आहे.


डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी अनंत गर्जेला मुंबईच्या सत्र न्यायालयाने जामीन दिला. यामुळे तब्बल तीन महिन्यांनी अनंत गर्जे तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.


गौरीने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक करत चौकशी केली होती. गौरी गर्जेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप गौरीच्या पालकांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.


अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह फेब्रुवारी २०२५ मध्ये झाला होता. दोघांचेही मूळ गाव एकच होते. पण मागील काही वर्षांपासून ते दोघेही मुंबईत स्थायिक होते. गौरी गर्जे या केईएम रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर होत्या. तर अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून काम करत होते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सुरळीत सुरू होते. पण लवकरच गर्जे दांपत्यात वाद सुरू झाले. यातून परिस्थिती बिकट झाली आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये गौरीने जीवन संपवले. या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचार, पतीचे अनैतिक संबंध आदी मुद्यांच्याआधारे तपास करून पोलिसांनी संशयावरून आरोपी म्हणून अनंत गर्जेला अटक केली होती.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौकात महावितरणच्या कार्यालयाला आग, फर्निचर आणि कागदपत्रांचे नुकसान

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौक परिसरात असलेल्या महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीतील एका

Gardening Tips: घरच्या घरी उगवा ताज्या भाज्या आणि फळं; जाणून घ्या भन्नाट पद्धत

[caption id="attachment_1067170" align="alignnone" width="850"] घरात झाडं लावण्याची इच्छा अनेकांना असते. मात्र, माती घाण होण्याची , मोठ्या कुंड्या

Kavya Maran : संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर आणि काव्या मारन अडकणार लग्नबंधनात; २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत पार पडणार विवाह सोहळा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर (Aniruddha Ravichandran) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH)

पनवेलमध्ये पहिली नागरी बस सेवा सुरू होणार, २८८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकांच्या

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट ! हॉटेल, लॉज आणि वाहन बाजारांवर कारवाई

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणारा राष्ट्रपतींचा नाशिक दौरा लक्षात घेता शहर पोलिसांनी

हिरो एक्स्ट्रीम 160आर 4व्ही आणि 250आरच्या अपडेटेड बाइक्स लाँच; किंमत जाणून घ्या...

दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारात 2026 मॉडेलची अपडेटेड हिरो एक्स्ट्रीम 160आर 4व्ही आणि अपडेटेड