Trending: दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा

मुंबई: आजच्या काळात जिथे लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजाव केला जातो, तिथे २०२३ बॅचच्या दोन तरुण आयएएस अधिकाऱ्यांनी साधेपणाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये सेवेत असलेले एसडीएम माधव भारद्वाज आणि गुजरातच्या जामनगरमध्ये सेवेत असलेल्या एसडीएम अदिती वास बुधवारी विवाहबंधनात अडकले. कोणत्याही गाजावाजाशिवाय या जोडप्याने कोर्ट मॅरेज करून समाजाला मोठा संदेश दिला आहे. त्यांच्या या साधेपणाची सगळीकडेच चर्चा होत आहे.


मसुरीचे रहिवासी असलेले माधव आणि उत्तर प्रदेशच्या बरेली येथील अदिती यांची भेट प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणादरम्यान झाली होती. तिथेच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर त्यांनी थाटामाटात लग्न करण्याऐवजी नोंदणीकृत विवाहाला पसंती दिली. त्यानुसार त्यांनी नोंदणी करत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाय साधे पणाने केलेल्या या लग्नाचे कौतूक ही होत आहे.


बुधवारी अलवरच्या जिल्हाधिकारी अर्पिता शुक्ला यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नाची नोंदणी केली. यावेळी कोणतेही ढोल-ताशे किंवा व्हीआयपी पाहुणे नव्हते. केवळ दोन्ही बाजूंचे आई-वडील आणि भावंडांच्या उपस्थितीत त्यांनी एकमेकांना हार घालून विवाह विधी पूर्ण केले. माधव भारद्वाज यांनी अनेक आव्हानांवर मात करून यूपीएससीमध्ये ५३६ वी रँक मिळवली होती. तर अदिती यांनी पहिल्याच प्रयत्नात ५७ वी रँक पटकावली आहे. माधव भारद्वाज हे २०२३ बॅचचे अधिकारी आहेत. आयआयएममधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यूपीएससीमध्ये ५३६ वी रँक मिळवली आहे. लोकोमोटर दिव्यांगत्व असूनही जिद्दीने त्यांनी यश मिळवले आहे.


तर अदिति वासने या उत्तर प्रदेशच्या आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ५७ वी रँक मिळवून बरेली जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले. दिल्लीच्या मिरांडा हाऊसच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. अलवरच्या मिनी सचिवालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. केवळ रक्ताच्या नात्यातील जवळची माणसे या सोहळ्याचे साक्षीदार होती. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी अत्यंत गोपनीय आणि साध्या पद्धतीने हा विधी उरकला. उच्चशिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार