Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान; आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका

बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन काढणीच्या टप्प्यावर आलेली गहू, हरभरा यासह अन्य रब्बी पिके भिजली. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून त्याचा थेट परिणाम शेतशिवारातील बहरलेल्या रब्बी पिकांवर दिसून येत आहे. गहू, ज्वारी, कांदा आणि हरभरा या पिकांवर किडी, अळी व विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. काही ठिकाणी आंब्याच्या बागांनाही फटका बसला असून मोहोर गळून पडला आहे.


अंबाजोगाई तालुक्यातील पूस परिसरासह काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड शहर व परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे काढणीला आलेला गहू व हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे. मागील पाच वर्षांपासून फेब्रुवारी अखेर व मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीच्या घटना घडताना दिसत असून, याच काळात काढणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. यंदा माजलगाव धरण भरलेले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात रब्बी हंगामाची पेरणी केली होती.


हरभरा गहू समवेत ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करत मदत जाहीर करावी अशी मागणी पुढे आली आहे


मशागतीसाठी खर्च करून जोपासलेली पिके अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करत आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा