'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील पुरुष गेला आहे. हे दु:ख पाच कुटुंबातील लोकांच आहे. ही वेळ दुसर्‍या कोणावर येऊ नये ही पांडुरंगाकडे प्रार्थना करते. अशा घटना घडत असतील तर तपासणी झाली पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.


सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,रोहित पवार, जय पवार यांनी हा विषय लावून धरला. हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब आहे. ही एक सुरुवात आहे. मला हा पहिला रिपोर्ट आहे अस वाटतं. विमान वाहतूक मंत्री हे व्यवस्थित तपास करण्याच्या सूचना देतील. रोहित पवार यांच्या भावना समजू शकते.आमच्या घरात सगळे अस्वस्थ झाले आहेत.अजून पूर्ण रिपोर्ट पुढे येऊ द्या, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.


सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,10 दिवसात संसद अधिवेशन सुरू होईल तेंव्हा हा मुद्दा उपस्थित करू, सगळ्या कंपन्या नियमाने चालवली पाहिजे. सगळ्याच विमानाचं ऑडिट झालं पाहिजे. काल परवा झारखंडमधे देखील असच विमान कोसळलं, पुढचे आठ दिवस वाट पाहू. सध्या चौकशी सुरु आहे, त्यामुळं आता अंतिम निर्णयवर येणे योग्य नाही. सगळ्या कंपन्या नियमाने चालवली पाहिजे. कोणाच्या मनमानी चालणार नाही,दादांचा अपघात, झारखंड अपघात, विमान वाहतूक मंत्री यावर सविस्तर चर्चा आणि सरकारचं स्टेटमेंट आलं पाहिजे, अशी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.


सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आदरणीय शरद पवार साहेबांना आज पुण्याच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते आता मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबईत त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून रुटीन चेकअप केले जाईल. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २-३ दिवस ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांनी पुन्हा एकदा संसदेत प्रतिनिधित्व करावे, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे ,पवार साहेबांवर जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अलोट प्रेम असून, त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे ही सर्वांचीच इच्छा आहे.कालच माननीय शशिकांत शिंदे आणि माननीय जयंत पाटील यांनी उद्धवजी ठाकरे यांची वेळ मागितली होती. महाविकास आघाडीतर्फे आदरणीय शरद पवार साहेब यांना 'संमतीचा उमेदवार' म्हणून पाठवण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत.मी स्वतः शिवसेना (UBT) नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांना विनंती केली आहे की, सर्वांची इच्छा असेल तर आदरणीय साहेबांना सर्वांनी मिळून राज्यसभेवर पाठवूया.यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना प्रेमाने विनंती केली आहे ,गरज पडली तर मी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही बोलेन,असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.


पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मी ओम बिर्लाजी यांचे मनःपूर्वक आभार मानते, एवढी मोठी जबाबदारी आणि विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, अनेक आम्ही विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना ऑपरेशन सिंदूर होतं तेव्हाही आम्हाला संधी दिली होती, आणि आमचंही एक मत आहे, आदरणीय शरद पवार साहेबांनी नेहमीच आम्हाला सांगितले आहे की, देशाच्या हिताच जेव्हा असतं, तेव्हा आपले सगळे मत मनभेद, सगळं बाजूला ठेवून, देशाच्या हितासाठी आपण एकत्र काम करायचं, जे हे मैत्रीची ग्रुप बनवलेत त्याच्यावरती आम्ही देशाच्या वतीने अनेक देशासोबत चर्चासत्र करणार आहोत, आणि अर्थातच त्याची पहिली नोट ही आलेली आहे, पुढे काम कसं राहील,त्याचे बेसिक कसे असेल हे आम्हाला पार्लमेंटरी ऑफिसर मिनिस्टर किंवा सरकारकडून आम्हाला आलेलं नाही ,अजून त्यातील स्कोप काय आहे,किती वेळ द्यावा लागेल,काय अपेक्षित आहे,पण अर्थातच परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या वतीने आम्हाला सगळ्यांनाच जर भारताचं इमेज असेल, त्याच्याबरोबर काम करायचं असेल, म्हणजे सोशल असेल,पॉलिटिकल असेल, किंवा बिजनेस पॉलिसी असेल, या सगळ्यांसाठी जर सगळे खासदार मिळून चांगलं करू पाहता, मला असे वाटते त्याचे आपण सगळ्यांनी मिळून देशाच्या हितासाठी स्वागत केले पाहिजे, आणि मी जाहीरपणे भारत सरकारचे आणि ओम बिर्लांजीचे मनःपूर्वक आभार मानते, तेवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा