मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन


"लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन


मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी "जावे विनोदाच्या गावा" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित "लोकसेवेचा लोकजागर" या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.४५ यावेळेत "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे संयोजन मा. प्रा. राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधानपरिषद, मा. ॲड. राहुल नार्वेकर, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, मा. डॉ. नीलम गोऱ्हे, उप सभापती महाराष्ट्र विधानपरिषद आणि मा. श्री अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष  महाराष्ट्र विधानसभा यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.



याप्रसंगी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित "लोकसेवेचा लोकजागर" या ग्रंथाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि सर्व महनीय व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा. उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, मा. संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत, विधिमंडळ मराठी भाषा समिती प्रमुख श्री. आशुतोष काळे यांच्या सन्मान्य उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.



"जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदाचे दालन उलगडले जाईल त्याचप्रमाणे "आचार्य अत्रे व पु.ल. देशपांडे : विनोदाची दोन शिखरे" या विषयावर वक्ते मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद हे संवाद साधतील. कार्यक्रम संकल्पना उत्तरा मोने यांची असून केदार शिंदे, हृषिकेश जोशी, श्रीरंग भावे, अदिती प्रभुदेसाई, धनश्री दामले यांचा अभिवाचक आणि गायक म्हणून सहभाग असेल. मराठीतील श्रेष्ठ लेखकांच्या अभिजात साहित्याचे यावेळी अभिवाचन तसेच मराठी गीतांचे सादरीकरण यावेळी होईल. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, अधिवेशन वार्तांकनासाठी उपस्थित पत्रकार अशा सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे करण्यात आले आहे
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन