शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत बातमी महत्त्वाची आहे. कायम धावपळीत असणाऱ्या आपल्या आयुष्यात बँकेची कामं आपण अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत ढकलतो.


जर तुमचं असं काही काम अडकलं असेल, तर आता उशीर करू नका. कारण उद्यापासून बँकांवर 'होळी' आणि 'विकेंड'चा असा काही रंग चढणार आहे की, सलग पाच दिवस बंद राहू शकतात.


होळीनिमित्ताने पुन्हा एकदा आरबीआयने सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शनिवार आणि रविवार शेवटचा असल्याने दोन दिवस बँक बंद राहतील. २ मार्च होलिका दहन असल्याने काही ठराविक राज्यात बँका बंद राहतील.


३ मार्च धुलिवंदन आणि डोल जत्रा निमित्त मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांत बँकांचे कामकाज होणार नाही. ४ मार्च होळीचा मुख्य सण असल्याने देशाच्या बहुतांश भागात बँकांना सुट्टी असेल.होळीच्या सणामुळे घराघरात आनंदाचं वातावरण असणार आहे, सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे.


खिशात ऐनवेळी पैसे नसतील तर अडचणीत सापडू शकता. बँका बंद असल्या तरी ATM सेवा सुरू राहील, पण सलग सुट्ट्यांच्या काळात अनेकदा एटीएममधील कॅश संपण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शक्य असल्यास आजच आवश्यक तितके पैसे काढून ठेवा.


या कालावधीमध्ये यूपीआय (UPI) सेवा सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे पैसे पाठवण्याचे व्यवहार तुम्ही करू शकता. फक्त चेक क्लिअरन्स किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन करायची कामं असतील, तर मात्र तुम्हाला ४ मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल. प्रत्येक शहरात स्थानिक सणानुसार सुट्ट्यांमध्ये बदल असू शकतो. त्यामुळे आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन किती दिवस आणि कशी सुट्टी असणार याची माहिती करून घ्या.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा