Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही देशांच्या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रतिष्ठित कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. हा दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री योगी म्हणाले, "जपानमध्ये आम्ही विविध कंपन्यांसोबत ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. दरम्यान, सिंगापूरमध्ये ₹६०,००० कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत."


मुख्यमंत्री योगी यांच्या दोन्ही देशांच्या चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, २.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले. शिवाय, उत्तर प्रदेशने जपानच्या यामानाशी प्रीफेक्चरसोबत ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानावर करार केला आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षण मिळेल.



जपान दौऱ्यात मोठे यश :


जपानमधील गुंतवणूक परिषदेत राज्य सरकारला हजारो कोटी रुपयांचे MoU आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळाले, प्रमुख जपानी कंपन्यांमध्ये Kubota Corporation, Spark Minda (टोपो ठेन्सी सहकार्यनि), Japan Aviation Electronics Industry आणि Nagase & Co., Ltd. यांचा समावेश आहे.


B2G बैठकीत Suzuki Motor Corporation, Honda Cars India Ltd., Konoike Transport Co., Ltd., Mitsui & Co., Ltd., Rapidus Corporation, Marubeni Corporation, Sumitomo Realty & Development Co., Ltd. आणि MUFG Bank यांनी सहभाग घेतला, गुंतवणुकीची प्रमुख क्षेत्रे कृषी यंत्रसामग्री, ऑटो ओईएम आणि घटकनिर्मिती, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, कंप्रेस्ड बायो गैस, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग अशी आहेत.



ग्रीन हायड्रोजन (Green hydrogen) उत्कृष्टता केंद्र :


जपान दौऱ्यात हरित ऊर्जा सहकार्यास चालना देत University of Yamanashi, Yamanashi Hydrogen Company, IIT Kanpur, Harcourt Butler Technical University, IIT BHU आणि Madan Mohan Malaviya University of Technology यांच्या सहकार्याने ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सतन्स स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि