Israel attacks Iran: बॉलिवूडची अभिनेत्री सोनल चौहान अडकली दुबईत; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

मुंबई: अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला असून मोठा युद्धाचा वणवा पेटला आहे. तिन्ही देशांमध्ये घमासान युद्ध सुरु असून हल्ले- प्रतिहल्ल्यांनी जगभरात खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत ८ देशांना या युद्धाची झळ पोहोचली असून आशिया खंडामध्ये युद्धाचे काळे ढग निर्माण झाले आहेत. या युद्धाचा फटका दुबईलाही बसला असून अनेक जण दुबईत अडकले आहेत. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनल चौहानही दुबईमध्ये अडकली आहे, तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.



बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान अडकली दुबईत



बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबईमध्ये अडकली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर दुबईला जाणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीला भारतात परत येणे कठीण झाले आहे. याबाबत तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत देशाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.


अभिनेत्रीने भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींकडून मदतीची विनंती केली आहे. इंस्टाग्रामवर पंतप्रधानांना टॅग करत अभिनेत्रीने लिहिले आहे की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सध्या सुरू असलेल्या संकटात मी दुबईमध्ये अडकली आहे. विमाने रद्द करण्यात आली आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही. मला सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी मदत करण्यासाठी मी सरकारकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मागते. सुरक्षित परतीसाठी सरकारकडून कोणत्याही मदत आणि मार्गदर्शनासाठी मी अत्यंत आभारी राहीन.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि