पाकिस्तान सोडा, मायदेशी परता; अमेरिकेचे कराची आणि लाहोरमधील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना निर्देश

वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. याचे पडसाद पाकिस्तानातही दिसून येत आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणनेही अमेरिका-इस्रायल जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, खामेनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानात हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. यामुळे, अमेरिकेने बुधवारी कराची आणि लाहोरमधील आपल्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था पाहता, अमेरिकन परराष्ट्र विभागाने लाहोर आणि कराचीमधील बिगर-आणीबाणी सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत.


महत्वाचे म्हणजे, या दोन्ही शहरांतील दूतावासांनी ६ मार्चपर्यंतच्या सर्व व्हिसा प्रक्रिया आधीच बंद केल्या आहेत. मात्र, राजधानी इस्लामाबादमधील दूतावासाच्या स्थितीत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दहशतवादी हल्ल्यांचा इशारा - अमेरिकेने जारी केलेल्या ट्रॅव्हल ॲडव्हायझरीमध्ये, पाकिस्तानातील दहशतवादी हिंसाचाराचा मोठा इशारा दिला आहे. दहशतवादी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, वाहतूक केंद्रे, बाजारपेठा, सरकारी इमारती आणि लष्करी तळांना लक्ष्य करू शकतात. असे यात म्हणण्यात आला आहे. २८ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात ८६ वर्षीय खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आखाती देशांतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने केवळ पाकिस्तानच नव्हे, तर सौदी अरब, ओमान आणि सायप्रस येथील आपल्या कर्मचाऱ्यांनाही देश सोडण्याची निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे