T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. ५ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी, ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि यशासाठी प्रार्थना केली.


ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी पारंपारिक पूजा विधी केले. मंदिरात भाविकांच्या गर्दीत, क्रिकेपटूंनी गणपतीचे दर्शन घेतले आणि संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. हे तिघेही सध्या भारतीय संघातील महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत.


या विश्वचषकात सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, अभिषेक शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ धावा केल्या, त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध ५५ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावा केल्या. नॉकआउट सामन्यांमध्ये या सलामीवीर फलंदाजाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.





दुसरीकडे, ईशान किशनने नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले, त्यानंतर सुपर ८ सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध ३८ धावांची खेळी केली. आगामी सामन्यात देशाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. अक्षर पटेलने या विश्वचषकात अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एक विकेट घेतली. त्याच्याकडून चाहत्यांना केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही खूप अपेक्षा आहेत.


टीम इंडियाने अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग चार ग्रुप स्टेज सामने जिंकून सुपर ८ मध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करल्यानंतर, भारताने झिम्बाब्वेचा ७२ धावांनी पराभव केला. त्यानंतर, निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव करून सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला