छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक सेवा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल शिबीर अभियान” ७ मार्चपासून सुरू होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, सर्व स्तरावरील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी पत्रकार परिषदेत केले.


या विशेष अभियानांतर्गत तालुक्यातील विविध भागांमध्ये महसूल शिबिरे आयोजित करण्यात आली असून नागरिकांना त्यांच्या गावाजवळच सेवा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन फेऱ्या टाळून नागरिकांचे वेळ व खर्च दोन्ही वाचणार आहेत. या अभियानाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. ७ मार्च – निकम स्कूल, लोणेरे १४ मार्च – ग्रामपंचायत तळाशेत - इंदापूर आणि ग्रामपंचायत निजामपूर १० एप्रिल – मराठी शाळा, विळे, १७ एप्रिल – बुद्ध विहार, गोरेगाव,८ मे – तलाठी भवन, माणगाव, १५ मे – ग्रामपंचायत मोरबा, ही सर्व शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहेत.


या शिबिरांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन जीवनातील विविध समस्या आणि तक्रारी तातडीने निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः उत्पन्न दाखला, जात दाखला, रहिवासी दाखला, वारस प्रमाणपत्र, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी तसेच इतर महसूल विषयक कागदपत्रे तातडीने देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया शिबिरातच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

Comments
Add Comment

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता